झरेकाठी । झुंझार न्यूज

राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळापूर तालुका – राहुरी या शाळेत शनिवार दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सदर प्रसंगी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमात राजमाता जिजाऊ माता गट ,राणी लक्ष्मीबाई माता गट व कल्पना चावला माता गट या माता गटांचे उद्बोधन करण्यात आले. तसेच माता पालकांना विद्यार्थ्यांचे आरोग्य, आहार, स्वच्छता व सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून महिलांनी स्वतः साठी वेळ द्यावा व स्वतःचे छंद जोपासत विद्यार्थ्यांचे जीवन फुलवण्यासाठी सदैव तत्पर व जागरूक राहावे यासाठी मुख्याध्यापक श्री वैष्णव संतोष यांनी मार्गदर्शन केले.समाजाचा शाळेतील सहभाग वाढवावा यासाठी आवाहन केले. विविध स्पर्धा परीक्षा व घरचा अभ्यास याबाबत सहशिक्षिका श्रीमती दुबे योगिता यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी महिलांनी संगीत खुर्ची व चमचा लिंबू या स्पर्धांचा मनसोक्त आनंद घेतला. संगीत खुर्ची स्पर्धेत सौ गीता मच्छिंद्र सांगळे तर चमच्या लिंबू स्पर्धेत सौ रेणुका रामराव साबळे या विजेत्या ठरल्या. विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

 

सदर कार्यक्रमाचे प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सतीश हारदे,सरपंच श्री दादासाहेब हारदे, पंचायत समिती राहुरी माजी सभापती भीमराज हारदे, माधव हारदे, कामगार पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे ,श्री चांगदेव हारदे, सचिन मुसमाडे ,अमोल हारदे, शिवा हारदे, मनोज हारदे उपस्थित होते. सदर उपक्रमाचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री मोहनीराज तुंबारे , शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती नंदा गवळी व केंद्रप्रमुख श्रीमती नीलिमा गायकवाड यांनी कौतुक केले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed