कोपरगांव । झुंझार न्यूज

शहरातील निवारा येथील डॉ. कांचन राजेंद्र लवांडे हिने कान-नाक-घसा एम.एस. वैद्यकिय पदव्युत्तर परिक्षेत ७२.३७ टक्के गुण मिळवुन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होत राजर्षी छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात (कोल्हापुर) प्रथम कमांक. पटकावला आहे. 

           

डॉ. कांचन लवांडे हिने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक हिवाळी नोव्हेंबर डिसेंबर २०२५ सत्रात झालेल्या एम.डी./ एम.एस परिक्षेत हे यश प्राप्त केले. राजर्षी छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय कोल्हापुर येथे डॉ. कांचन लवांडे यांचे संपूर्ण वैद्यकिय शिक्षण झाले, दहावी, बारावी परिक्षेतही त्या विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाल्या होत्या. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे यश मिळविले आहे.

             

तिच्या या यशाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, आमदार आशुतोष काळे,  माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किसनराव लवांडे, कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्यासह विविध स्तरावर. अनेकांनी अभिनंदन केले आहे.

         

डॉ. कांचन लवांडे हि कोपरगांव आगाराचे सेवानिवृत्त सहायक आगारप्रमुख भाउसाहेब पोटभरे यांची नात तर राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहिल्यानगरचे प्रा. राजेंद्र लवांडे यांची कन्या आहे. तिला राजर्षी छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय कोल्हापुरचे अधिष्ठाता अजित लोकरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed