काष्टी । झुंझार न्यूज 

 

 

शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग आणि गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या परिक्रमा पॉलिटेक्निकने (काष्टी) आपल्या शिरपेचात मानाचे अनेक तुरे रोवले आहेत. शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच सामाजिक उत्तरदायित्वाचे भान राखत संस्थेने केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतून मोठी झेप घेतली आहे.


व्हर्च्युअल लॅब्स (IIT Bombay) समन्वयाचे कौतुक IIT बॉम्बे अंतर्गत चालणाऱ्या ‘व्हर्च्युअल लॅब्स’ (Virtual Labs) उपक्रमाचे समन्वयन करणाऱ्या को-ऑर्डिनेटरच्या कार्याची दखल घेत त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना प्रगत प्रयोगशाळांचा अनुभव घरबसल्या मिळत आहे. व्हर्च्युअल लॅब्स नोडल सेंटर (MoE, भारत सरकार)परिक्रमा पॉलिटेक्निकला भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत (NMEICT) राबविण्यात येणाऱ्या व्हर्च्युअल लॅब्स उपक्रमाचे अधिकृत नोडल सेंटर म्हणून मान्यता मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे.

विशेष अभिमानाची बाब म्हणजे देशातील 296 नोडल सेंटर्समध्ये परिक्रमा पॉलिटेक्निकला अखिल भारतीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

व्हर्च्युअल लॅब्स मधे विद्यार्थी प्रत्यक्ष प्रयोग ऑनलाईन सिम्युलेशनद्वारे करू शकतात.कुठेही, कधीही प्रयोगांची पुनरावृत्ती करू शकतात प्रयोगांची स्पष्ट समज, डिजिटल व कौशल्याधारित शिक्षण, CO-PO आधारित शिक्षणास मदत, खर्च, धोका व वेळेची बचत, राष्ट्रीय स्तरावरील ई-लर्निंग सुविधा यामुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे होणार आहे.


MSBTE कडून ‘Excellent’ ग्रेड प्राप्त बाह्य शैक्षणिक संनियंत्रण समिती (EAMC – MSBTE) द्वारे करण्यात आलेल्या तपासणीत परिक्रमा पॉलिटेक्निकला ‘EXCELLENT’ ग्रेड बहाल करण्यात आला आहे
परिक्रमा पॉलिटेक्निक तंत्रशिक्षणात नवोपक्रम व गुणवत्ता यासाठी सदैव अग्रणी असते.याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारत सरकार, शिक्षण मंत्रालय आणि अटल इनोव्हेशन मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बिल्डाथॉन २०२५’ (Buildathon 2025) अंतर्गत परिक्रमा पॉलिटेक्निकने ५ शाळा दत्तक घेतल्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण विचार रुजवण्यासाठी संस्था विशेष मार्गदर्शन करणार आहे

त्याच बरोबर 9 जाने. रोजी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई स्थापत्य अभियांत्रिकी गट नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभाग व परिक्रमा तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमान ने राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली.स्पर्धेत (State Level Quiz Competition) चमकदार कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. तांत्रिक ज्ञानासोबतच सामान्य ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी विविध फेऱ्यांमध्ये यश संपादन केले.या कार्यक्रमाला श्री. आशीष ए. निकम (विशेष कार्य अधिकारी, आरबीटीई, छत्रपती संभाजीनगर)डॉ. अजय एम. अगरकर (प्राचार्य, शासकीय पॉलिटेक्निक अहिल्यानगर) डॉ. दादा बी. करंजुळे (वरिष्ठ व्याख्याता, *शासकीय पॉलिटेक्निक अहिल्यानगर) उपस्थित होते.या आदरणीय मान्यवरांनी स्पर्धेच्या विद्यार्थ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले. या मधे एकूण १३ महाविद्यालयांनी या प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेऊन स्थापत्य अभियांत्रिकीमधील आपली कौशल्ये आणि ज्ञान प्रदर्शित केले. यामध्ये प्रथम पारितोषिक श्री. हिरालाल हस्तीमल (जैन ब्रदर्स) पॉलिटेक्निक, चांदवड. महाविद्यालय तर द्वितीय पारितोषिक ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, नांदेड. या महाविद्यालयाने पटकावले.तर उत्तेजनार्थ पारितोषिक संदीप पॉलिटेक्निक, नाशिक.महाविद्यालय ठरले.

 

NPTEL परीक्षेत विद्यार्थ्यांची बाजी

IIT च्या वतीने घेण्यात येणाऱ्या जागतिक स्तरावरील NPTEL अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ‘ELITE’ आणि ‘SILVER’ मानांकन (Grade) प्राप्त करून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.

गुणवंत शिक्षक व मेंटॉरचा सन्मान

केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांनीही आपली कौशल्ये अद्ययावत ठेवली आहेत. NPTEL च्या ‘मेंटॉर अचिव्हमेंट’ कोर्समध्ये शिक्षक प्रमाणित झाले आहेत. तसेच, बोर्डाच्या परीक्षेत ज्या शिक्षकांच्या विषयांचा निकाल उत्कृष्ट लागला आहे, अशा ‘टॉप स्कोरर’ विषयांच्या शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला.


महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (MSBTE) जुलै २०२५ च्या न्यूजलेटरसाठी परिक्रमा पॉलिटेक्निकच्या विभागातील मजकुराची निवड करण्यात आली आहे. अशा प्रकारे राज्य स्तरावर संस्थेच्या उपक्रमांची नोंद घेतली जाणे ही अभिमानाची बाब मानली जात आहे. पायाभूत सुविधा, अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या निकषांवर संस्थेने हे यश मिळवले आहे.

या सर्व यशाबद्दल परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक, माजी मंत्री बबनराव पाचपुते , अध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते, सचिव आमदार श्री.विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते, ॲकॅडमी डायरेक्टर सौ.इंद्रायणी पाचपुते, मुख्य अति. कार्यकारी अधिकारी प्रा. अनिल पुंड, अती.ॲकॅडमी डायरेक्टर डॉ.संजिवजी कदमपाटील,,तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी, , इंजीनिअरिंग प्राचार्य मोहन धगाटे, एम.बी.ए. डायरेक्टर डॉ. सुदर्शन गिरमकर, बी.फार्मसी प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ डी.फार्मसी प्राचार्य रमेश शिंदे सायन्स कॉलेज प्राचार्य डॉ. पांडुरंग इथापे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे परिश्रम कमी आले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed