लोणी । झुंझार न्यूज

 

जिल्ह्याच्या सुपुत्री आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थीनी लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांचा भारत सरकारने सुभाषचंद्र बोस आपती व्यवस्थापन पुरस्कार देवून केलेला गौरव हा ‘अहीलेच्या लेकीचा सन्मान’ असल्याची प्रतिक्रीया देवून जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

भारत सरकारने लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना सुभाषचंद्र भोस आपती व्यवस्थापन पुरस्कार देवून गौरविले आहे.केरळ मधील वायनाड येथे २०२४ मध्ये घडलेल्या भीषण भूस्खलनात तसेच प्रतिकूल हवामानावर मात करून शेकडो नागरीकांचे प्राण वाचविण्यासाठी बचाव मोहीमेचे नेतृत्व केले होते. या महत्वपूर्ण कामगिरीत अवघ्या काही तासात १९०फूट लांबीच्या बेली ब्रिजची विक्रमी वेळेत उभारणी कर्नल सीता शेळके यांच्या नेतृत्वात झाली होती.

 

आपती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करून वायनाड येथील नैसर्गिक संकटात बजावलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल भारत सरकारने कर्नल सीता शेळके सुभाषचंद्र बोस आपती व्यवस्थापन पुरस्कार देवून केलेल्या सन्मानाबद्दल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

 

कर्नल सीता शेळके यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या आसीम धैर्याचा आणि कर्तव्यनिष्ठेचा सन्मान असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, वायनाड मधील संकट काळात त्यांनी दाखलेले धाडस आणि केलेल्या नेतृत्वाला देशाने सलाम केला आहे.

 

अहील्यानगरची सुपूत्री आणि विशेष करून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनीने जिद्द आणि चिकाटीचा वारसा जपणार्या ‘अहीलेच्या लेकीचा’ झालेला सन्मान जिल्ह्याचा नावलौकीक आणि अभिमान वाढविणारा असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *