शिवसैनिक आणि माजी नगरसेवक आप्पा केसेकर यांच्या निधनान समाजाच्या सर्व घटकाशी एकरूप झालेला कार्यकर्ता आपण गमावला असल्याची संवेदना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.
आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील यांनी म्हणले आहे की,आप्पा केसेकर यांचा संपर्क आला तेव्हापासून संपूर्ण आयुष्य समाजासाठी त्यांनी वाहून घेतल्याचे आपण पाहीले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव त्यांच्या सर्व कार्यावर होता.
कोणत्याही प्रश्नासाठी त्यांची आंदोलनाची तयारी असायची अनेक समस्यांसाठी ते माझ्याशी संपर्क करायचे पण व्यक्तिगतपेक्षा सार्वजनिक प्रश्नासाठी त्यांचा नेहमी पाठपुरावा असायचा.लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या सर्वच निवडणुकांमध्ये आप्पा केसेकर यांची राहीलेली सक्रीयता सदैव आठवणीत आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या काळातच त्यांना रूग्णालयात दाखल केल्याचे समजल्यानंतर स्व:ता जावून भेट घेतली सुरू असलेल्या उपचारांबाबतही डॉक्टरांशी चर्चा केली.पुणे येथे पुढील उपचारासाठी गेल्यानंतरही त्यांच्या नातेबाईकाडून तब्येतीची माहीती घेत होतो.यासर्व संकटावर मात करून आप्पा पुन्हा सक्रीय होतील आशी अपेक्षा होती.परंतू नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
आज आपल्यात आप्पा केसेकर यांच्या सारखा लढावू कार्यकर्ता नाही,याचे दु:ख खूप मोठे आहे.सर्वाशी समन्वय राखणारा आणि संघटनेला महत्व देणारा एक कट्टर शिवसैनिक गमवाला आहे.