संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल इग्लिश स्कूलच्या विदयार्थ्यानी आपल्या मधील असणार्या नकारात्मक , लालच , राग , द्वेष , मत्सर , तक्रारी आदीसह विविध असणाऱ्या वाईट सवयी कागदावर लिहून वाईट गोष्टीच्या होळी करत सुस्कृत नागरिक बनण्याची होळी समोर विदयार्थ्यानी वचन दिले . यावेळी प्राचार्य सचिन जाधव , कविता खांदे , पुनम म्हस्के यांनी विदयार्थ्याना होळीबाबत कथा सांगून होळी ही मणुष्या जीवनात किती महत्वाची आहे हे पटवून सांगितले . यावेळी प्राचार्य सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना सागितले की निसर्गाला व मणुष्याला हानी पोहचेल असे सणसुद साजरे करु नका . निसर्गाच्या माध्यमातून मणुष्याला उपयोगी पडेल अशा विदयार्थ्यानी कार्य करावे . यावेळी ग्रामस्थ , शिक्षक , कर्मचारी व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Post Views: 316
