कोल्हार महाविद्यालयात महिला दिन उत्साहात संपन्न
 सोशल मीडियाचा अति वापरामुळे चिंता, नैराश्य, झोपेचे विकार, भ्रम, आत्महत्येचे विचार आणि स्वत:ला हानी पोहोचविणे                                                                                                                                 झरेकाठी : झुंजार न्यूज                                                                                 अत्याधुनिक स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या विस्तारामुळे गेल्या काही वर्षात सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सोशल मिडियाने मानवी जीवनात मोठी क्रांती आणली असली तरी त्याचे काही दुष्परिणामही आहेत. हे दुष्परिणाम महिलांसाठी अत्यंत घातक आहेत”. असे प्रतिपादन न्यायमूर्ती आदिती नागोरी (दिवाणी न्यायाधिश, वरिष्ठ स्थर, राहाता) यांनी केले.                                                                                                कोल्हार महाविद्यालयात तालुका विधी सेवा कोपरगाव अंतर्गत राहाता न्यायालय, जनसेवा फाउंडेशन लोणी आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोल्हार यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनानिमित्त ‘महिला मेळावा’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून न्यायमूर्ती आदिती नागोरी बोलत होत्या. या महिला मेळाव्यासाठी श्रीमती ए. ए. कुलकर्णी (सहदिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्थर, राहाता), श्री. एस. एस. मुलाणी (सहदिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्थर, राहाता), श्रीमती वाय. एस. कोकाटे (सहा.पोलीस निरीक्षक,शिर्डी), श्रीमती ज्योती आर. सिसोदिया (राहाता वकील संघ), श्रीमती एस. व्ही. कामटे (राहाता वकील संघ), श्रीमती एस. एस. म्हस्के (राहाता वकील संघ) आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रमुख भाषणात न्यायमूर्ती आदिती नागोरी म्हणाल्या की, ‘सोशल मीडियाचा अति वापरामुळे चिंता, नैराश्य, झोपेचे विकार, भ्रम, आत्महत्येचे विचार आणि स्वत:ला हानी पोहोचविणे आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. म्हणून महिलांनी व तरुण मुलींनी सोशल मिडियाच्या अति वापरापासून दूर राहिले पाहिजे” असे आवाहनही त्यांनी केले.                                                                                                                   याप्रसंगी श्रीमती ए. ए. कुलकर्णी, श्री. एस. एस. मुलाणी, श्रीमती वाय. एस. कोकाटे, श्रीमती ज्योती आर. सिसोदिया, श्रीमती एस. व्ही. कामटे यांचीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन भाषणे झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या महिला मेळाव्यासाठी परिसरातील दोनशेपेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या. त्या सर्वांना महाविद्यालयाच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले.
या महिला मेळाव्याचे नियोजन डॉ.हरिभाऊ आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. संगीता धीमते (समन्वयक, महिला सक्षमीकरण कक्ष), डॉ.प्रतिभा कानवडे (उपप्राचार्या) व कमिटीने केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. प्रतिभा कानवडे यांनी केले. आभार डॉ. अर्चना विखे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.नीलिमा खर्डे व कुमारी सानिका देवकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील महिला प्राध्यापक- प्राध्यापकेतर वर्ग, बचत गट महिला व विद्यार्थिनी मोठया संख्यने उपस्थित होत्या.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *