​आश्‍वी । झुंझार न्यूज

 

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात आणि तळागाळातील महिलांच्या सक्षमीकरणात सतत आग्रही असणाऱ्या आश्‍वी खुर्द (ता. संगमनेर) येथील सौ. कांचनताई राजेंद्र मांढरे यांची भाजप महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्हा तसेच संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पक्षसंघटनेत कांचनताई मांढरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या अति महत्त्वाच्या अशा मुख्य कार्यकारिणीत (फादरबॉडी) जिल्हा महामंत्री म्हणून त्यांनी अतिशय कार्यक्षमतेने काम केले. तसेच महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तळागाळातील महिलांना पक्षाशी जोडत एक मजबूत संघटन उभे केले. त्यांच्या या प्रदीर्घ संघटनात्मक अनुभवाचा पक्षवाढीसाठी मोठा फायदा झाला आहे.

पक्षसंघटनेतील त्यांचे प्रदीर्घ अनुभव, काम करण्याची धडपड आणि महिला सक्षमीकरणातील योगदान लक्षात घेऊन भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी त्यांचा महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीत समावेश करुन त्यांच्यावर ‘राज्य उपाध्यक्ष’ पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.

 

दरम्यान, या निवडीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, बचत गटांच्या महिला प्रतिनिधी तसेच आश्‍वी आणि शिर्डी परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *