{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

‘अभ्यासाने असाध्य गोष्टी साध्य होतात’ – ह.भ.प. अरुणनाथगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन

झरेकाठी । झुंझार न्यूज

राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे ह.भ.प. वै. संत मुकुंददास महाराज यांच्या आशीर्वादाने आणि ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक (नेवासेकर) यांच्या प्रेरणेने आयोजित ‘अखंड हनुमंतराय हरिनाम सप्ताह’ आणि ‘संगीतमय नवनाथ कथा’ सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्तीचा महापूर लोटला असून, प्रवरा तीरावरील हे गाव हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे.

अभ्यासाने जीवन यशस्वी करा: स्वामी अरुणनाथगिरीजी

सप्ताहाच्या पाचव्या दिवशी (२२ ऑगस्ट) मार्गदर्शन करताना कथा प्रवक्ते स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज (श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान, भामानगर) यांनी तरुणाईला मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले, तरुणांनी खऱ्या अर्थाने अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या वयात ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या पूर्ण निष्ठेने केल्या पाहिजेत. शास्त्रात म्हटल्याप्रमाणे ‘अभ्यासे समर्थ होसी’, म्हणजेच अभ्यासाने असाध्य गोष्टीही साध्य होतात. आपले जीवन यशस्वी करण्यासाठी संतांच्या विचारांचे आणि मार्गदर्शनाचे पाऊल उमटवणे गरजेचे आहे.

महाराजांनी पुढे बोलताना अहिल्यानगर जिल्ह्याच्या आध्यात्मिक वैभवाचे वर्णन केले. “हा जिल्हा संतांचे माहेरघर आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून ते साईबाबांपर्यंत आणि मुकुंददास महाराजांपासून ते जनार्दन स्वामींपर्यंत थोर परंपरा या भूमीला लाभली आहे. दाढ येथील प्रवरेच्या पात्रात असलेली मुकुंददास महाराजांची समाधी ही ऋषिकेश-हरिद्वारची अनुभूती देते,” असे गौरवद्गार त्यांनी काढले.


या सप्ताहात दररोज सायंकाळी ६:३० ते ९ या वेळेत ‘संगीतमय नवनाथ कथा’ संपन्न होत आहे. श्री निळकंठ तरकासे बाबुजी यांनी या कथेचे लेखन केले असून, ह.भ.प. कैलास महाराज दुशिंग हे आपल्या सुमधुर संगीताची जोड देत आहेत. गायन आणि वादन साथ ह.भ.प. बाबासाहेब महाराज मगर, राहुल महाराज चेचरे, विशाल महाराज रोकडे, लखनगिरी महाराज आणि धर्मनाथ महाराज करत आहेत.

सप्ताहादरम्यान दररोज कथेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे नियोजन खालीलप्रमाणे आहे

१८ ऑगस्ट: श्री. सुनील सोपान पा. तांबे व श्री. अनिल सोपान पा. तांबे
१९ ऑगस्ट: सौ. वरदा व श्री. गंगेश तिलकनारायण पांडे
२० ऑगस्ट: श्री. माणिक हरिभाऊ गाडेकर व श्री. स्वप्नील माणिक गाडेकर
२१ ऑगस्ट: डॉ. सुभाष श्रीरंग गाडेकर
२२ ऑगस्ट: श्री. विलास देविदास पा. तांबे
२३ ऑगस्ट: श्री. प्रताप सखाहारी पा. तांबे, श्री. सखाहारी विश्वास पा. तांबे व चि. श्रीहरी दिनकर पा. तांबे
२४ ऑगस्ट: श्री. बाबासाहेब रावजी पारधे (मा. अप्पर जिल्हाधिकारी)

या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मंगळवारी, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या ‘काल्याच्या कीर्तनाने’ होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल

 

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ दाढ बुद्रुक, सर्व भजनी मंडळ, तरुण मंडळ, गणेश मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ, चाणक्य प्रतिष्ठान, साई छत्र फौंडेशन, श्रद्धा ग्राम विकास प्रतिष्ठान आणि गावातील विविध सामाजिक संस्था व मित्र मंडळे अहोरात्र परिश्रम घेत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व महात्मा फुले विद्यालय यांचेही विशेष सहकार्य लाभत आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *