पिंपरणे : झुंजार न्यूज
परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व संगमनेर साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पिंपरणे येथे आयोजित करण्यात आला होता.
मालपाणी,सह्याद्री,प.पू.गगनगिरी,श्रमिक, सावित्रीबाई फुले,पद्मभूषण भारदे, सराफ, चंदनेश्वर, न्यू हायस्कूल लिंगदेव, दादा वामन जोशी, ही विद्यालये ठरली यावर्षीच्या चैतन्य गगनगिरी करंडकाचे मानकरी ठरले
जिल्हाभरातून उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या स्पर्धकांमुळे या स्पर्धा विशेष गाजल्या होत्या. भरघोस रकमेची वैयक्तिक पारितोषिके,वैयक्तिक स्मृतीचिन्हे, तसेच सांघिक प्रत्येक गटांमध्ये तीन करंडक असे पारितोषिकांचे स्वरूप होते.एकूण चार गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.इयत्ता तिसरी चौथीचा प्रथम गट इयत्ता पाचवी ते सातवी द्वितीय गट इयत्ता आठवी ते दहावी तृतीय गट व इयत्ता अकरावी बारावी चतुर्थ गट असे गट होते.
चारही गटांमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी अनुक्रमे पुढील प्रमाणे उन्नती बंडू कोल्हे जि प शाळा महादेव मळा वडगाव पान, तिथी श्रीगणेश गुंजाळ भा.गु.पा.सह्याद्री विद्यालय ,काजल गुलाब बागुल गगनगिरी महाराज विद्यालय, ज्ञानेश्वरी भरत सातपुते श्रमिक ज्युनिअर कॉलेज , तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी विद्यार्थी आराध्या अर्जुन शेळके आनंदवन विद्यालय, ज्ञानेश्वरी तुषार गायकर भा.गु.पा. सह्याद्री विद्यालय, प्रज्योत दीपक शेळके सराफ विद्यालय, अर्पिता नरेंद्र राणे ओहरा ज्युनियर कॉलेज . वैयक्तिक तृतीय क्रमांक स्वराली प्रसाद धनेश्वर मालपाणी विद्यालय, प्राविण्य हौशीराम गोपाळे मालपाणी विद्यालय, उत्कर्ष सचिन भोर मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल, पूजा अनिल कोरडे पद्मभूषण भारदे हायस्कूल शेवगाव.
वैयक्तिक चतुर्थ क्रमांक राजेश्वरी चंद्रहास जाधव सावित्रीबाई फुले विद्यालय कृषी विद्यापीठ , श्रावणी विठ्ठल बोबले चंदनेश्वर विद्यालय, अमृता बंडू लव्हाट पद्मभूषण भारदे हायस्कूल शेवगाव,सृष्टी संतोष आहेर भा. गु. पा .सह्याद्री ज्युनिअर कॉलेज.
याच बरोबर पंचम क्रमांकाचे मानकरी चैतन्य वीरेंद्र बैरागी ,स्वराली संदीप इरोळे, कोमल लक्ष्मीकांत शर्मा ,सायमा मोहम्मद रफीक, जान्हवी भागवत घुले ,नूतन सालपुरे,जान्हवी विठ्ठल कोळेकर हे आहेत. याखेरीज विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात आली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता श्री संजय जाधव, गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा फटांगरे ,नायब तहसीलदार श्री उमाकांत कडनोर व श्री श्रीकांत लोमटे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री संदीप वायाळ संगमनेर वकील संघाचे उपाध्यक्ष अँड.उदयसिंह ढोमसे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते ही पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य गगनगिरी महाराज शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब देशमुख होते. याप्रसंगी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, उपाध्यक्ष लक्ष्मण ढोले, प्रकल्प प्रमुख श्री बाळकृष्ण महाजन संस्थेचे उपाध्यक्ष दिलीपराव देशमुख, सचिव कैलास शेठ काळे ,संचालक अशोकराव कोकणे ,सुरेशराव ठोंबरे ,भाऊसाहेब वाकचौरे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री के.सी.बागुल सर माजी गटशिक्षणाधिकारी श्री सुभाष पवार श्री अभिजीत देशमुख श्री अभिजीत शिंदे दूध संघाचे माजी संचालक श्री अण्णासाहेब राहींज,सरपंच श्री नारायण मरभळ, उपसरपंच श्री मिनीनाथ जोर्वेकर सर ,श्री संजय बागुल श्री नवनीत देशमुख श्री शिवाजीराव देशमुख ,मुख्याध्यापक श्री संजय बोरसे ,ग्रामसेवक श्री शेळके, पत्रकार सुभाष भालेराव, गोरख नेहे ग्रामपंचायत सदस्य , जिल्हाभरातील विविध विद्यालयातून आलेले पारितोषिक प्राप्त विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मुकुंद डांगे यांनी केले पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे यादी वाचन श्री ललित शेळके व श्रीमती कविता ढोमसे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुप्रसिद्ध निवेदिका स्मिता गुणे यांनी केले याप्रसंगी संगमनेर साहित्य परिषदेचे सदस्य परीक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते
