- संगमनेर : प्रतिनिधी शेती मधून बारमाही उत्पन्न मिळत नसल्याने घरची स्थिती तशी नाजूकच; मात्र तरीही शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करीत संगमनेर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील असणाऱ्या पानोडी येथील सोमनाथ बाळासाहेब जाधव या ३० वर्षिय तरुणाने सीए परीक्षेत यश संपादित केले आहे. शेती सह मेंढपाळ असणार्या कुटुंबातील सोमनाथ याने मिळवलेल्या प्रेरणादायी यशाचे ग्रामस्थानी कौतुक व सत्कार करुन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेंच्छा ! दिल्या
शेतीसह मेंढीपालन करणाऱ्या कुटुंबातील सोमनाथ याचे गावातीलचं जाधव वस्तीवरील असणार्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. तर सरदार थोरात विदयालयात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने आश्वी खुर्द येथील कॉलेजमधून १२ वी कॉमर्स शाखेमधून ६५ टक्के गुण मिळवले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पुणे गाठले. घरची स्थिती हलाखीची असल्याने पुणे येथे पार्ट टाईम काम करुन पुढील शिक्षण घेतले . सोमनाथला एक ना अनेक अडचणी आल्या; परंतु मनात जिद्द होती. वडील बाळासाहेब जाधव हे मेंढपालन करत रिकाम्या वेळेत इतराच्या शेतात जावून बैलाच्या मदतीने नांगरणी , शेती मशागत करुन त्यांतील मिळणाऱ्या पैशातून घरखर्च करुन उर्वरीत मुलाला पैसे पाठवून उच्च शिक्षणासाठी मदत करून चार्टड अकाऊटंट होण्यासाठी प्रेरणा दिली. त्याने सीएचे शिक्षण द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया पूणे येथे पूर्ण केले; तर आर्टिकलशिप रामचंद्र विठ्ठल सागर यांच्याकडे पूर्ण केली. सीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा देत या परीक्षेत त्याने अत्यंत घवघवीत यश मिळवले. ग्रामीण भागातील, शेतकरी व मेंढपाळ कुटुंबातील असलेला सोमनाथन न्यूनगंड बाजूला ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने आणि जिद्दीने मिळविलेले यश इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून सी ए होणारा पानोडी या गावांचा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे . यावेळी माजी पोलिस आधिकारी भाऊसाहेब चव्हाण , माजी उपसंरपच अशोकराव तळेकर , अॅड सदाशिवराव थोरात , प्रा रामनाथ पवार , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव , युवानेते रावसाहेब घुगे , ग्रा प सदस्य संजय जाधव , रंगन्नाथ मुंढे , पांडूरंग सांगळे , उदयोजक प्रविण खेडकर , पुंजा पाटील नागरे , प्रा दिपक जाधव , जालिंदर तळेकर , भारत शेवाळे , रविद्र जाधव , बाळासाहेब जाधव , संतोष चव्हाण , दत्तात्रय चव्हाण आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते . चौकट : १ ) ” विदयार्थ्यानी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःहून प्रयत्नशील असावे तर पालकांचे त्यांवर नियत्रण असावे मुलांच्या उच्च शिक्षण हीच आपली खरी संपत्ती असून शेतीबरोबर मुलाच्या शिक्षणाची पालकांनी काळजी घ्यावी ” भाऊसाहेब चव्हाण ( माजी पोलिस आधिकारी ) २ ) खडतर प्रवासातून सोमनाथ यांनी सी ए चे यश संपादन करत आई – वडीलासह गावांचे नाव रोशन केले . जीवनात इच्छा शक्ती असेल तर विदयार्थी हा जीवनात यशस्वी होतो . अशोकराव चव्हाण ( माजी उपसंरपच , पानोडी ) ३ ) सोमनाथ जाधव यांनी सी ए चे यश संपादन करत विदयार्थ्यासमोर एक आदर्श ठेवला असून सी ए ची प्रॉटीश मुंबई , पुण्यासारख्या शहरातून केल्यास जीवनात यशस्वी ठरेल अॅड सदाशिवराव थोरात
