संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

नांदुरी दुमाला येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय व नामदार बाळासाहेब भाऊसाहेब थोरात ज्युनिअर कॉलेज येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता व शाळेचे माजी विद्यार्थी संदीप वलवे होते.

 

प्रमुख अतिथी म्हणून राजहंस दूध संघाचे संचालक विलासशेठ कवडे, सिताराम शेटे, माजी स्कूल कमिटी अध्यक्ष सिताराम नेहे, कृतज्ञता फाउंडेशनचे अध्यक्ष सोपान शेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद देशमुख यांनी प्रास्ताविकात शाळेच्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांचा आढावा घेतला. विविध गटांतील आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांकासाठी ट्रॉफी तर इतर क्रमांकांसाठी शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संदीप वलवे म्हणाले की, “यश म्हणजे स्वतःच्या कार्यक्षमतेतून समाजात वेगळी ओळख निर्माण करणे. ध्येय, जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर विद्यार्थी मोठी उद्दिष्टे साध्य करू शकतात. तसेच विलास कवडे यांनी संवाद कौशल्य, वाचन आणि सहशालेय सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. सूत्रसंचालन किशोर शिंदे सर व प्रा. कवडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन बी. एस. पावसे सर यांनी केले. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed