परीक्षेबरोबरच आयुष्यातील, जगातील अनेक आव्हानाना सामोरे जाण्यासाठी सक्षम बना अरुण कडू पाटील
सात्रळ । झुंझार न्यूज
राहुरी तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या ना. स. कडू पाटील विद्यालय, व बापूजी सहादू कडू पाटील ज्युनिअर कॉलेज सात्रळ मध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यापूर्वी परीक्षेसाठी व पुढील भावी करिअरसाठी रयत शिक्षण संस्था उपाध्यक्ष अरूण कडू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे न्यू इंग्लिश स्कूल प्राचार्य अंकुशराव जामदार यांच्या उपस्थितीत शुभेच्छा समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष , प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व थोर स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार कॉ पी बी कडू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गारुडकर यांनी सर्वांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी ,करिअरसाठी मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या .या प्रसंगी यश दिघे, समर्थ अनाप, संस्कार पाटोळे, शाहिस्ता सय्यद, गौरी सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. उपशिक्षिका आश्विनी सोहनी यांनी विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत करणे गरजेचे आहे व त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास साधणे गरजेचे आहे याविषयी माहिती दिली. प्राध्यापक आण्णासाहेब गोर्डे यांनी अभ्यास व परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले . को . ना.कडू पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे यांनी शुभेच्छा देऊन कॉफीमुक्त अभियान व भयमुक्त वातावरणात परीक्षा कशी द्यावी याविषयी मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार चे प्राचार्य अंकुशराज जामदार यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे व माहितीच्या आधारे परीक्षा व करिअर यांचा जीवनातील सहसंबंध याविषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर,कॉ पी.बी कडू पाटील यांचे विचार आत्मसात करून, खूप वाचन करून निर्व्यसनी राहून आपले जीवन उज्ज्वल करा व सर्वांचे नाव मोठे करा असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था अरुण कडू पाटील यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन स्पर्धेच्या युगात रयतचा विद्यार्थी नेहमी पुढे असला पाहिजे यासाठी त्याने सतत प्रयत्नशील असले पाहिजे व आपले व्यक्तिमत्व व चारित्र्य यांची जपवणूक करून आपले पालक, शिक्षक ,शाळा, गाव, व देशाचे नाव मोठे करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्था उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, स्कूल कमिटी सदस्य किरण कडू पाटील , पंकज कडू पाटील, ज्येष्ठ पत्रकार किशोरशेठ भांड,प्राचार्य सिताराम गारुडकर, पर्यवेक्षिका हेमलता साबळे, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख विलास दिघे, को. ना. कडू पाटील मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार प्राचार्य अंकुशराज जामदार न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार क्रिडा शिक्षक दिपक मगर सर्व शिक्षक बंधू भगिनी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व रयत सेवकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन रामदास तांबे यांनी केले तर आभार प्रा विश्वास घुगे यांनी मानले.