नगर : झुंजार न्यूज                                                                                                                                       महाराष्ट्र राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर शिवाजीराव कर्डिलेंच्या रूपाने कमळ फुलल आहे. २०२०ला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर महाविकास आघाडीची एकहाथी सत्ता आली होती. १० मते राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळवून राष्ट्रवादीचा अध्यक्ष तर कॉंग्रेसचा उपाध्यक्ष या जिल्हा बँकेवर निवडून आले होते.

मात्र दुर्दैवाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. शेळके यांचं निधन झाल्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची जागा रिक्त झाली होती.अध्यक्ष पदाची जागा रिक्त झाल्याने या पदाच्या खुर्चीवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष बसणार, कीं निवडणुक बिनविरोध होणारं याकडे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राच लक्ष लागलं होतं. अश्यातच ७ मार्च रोजी जिल्हा बँक निवडणूकीच्या नियोजनासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हें अहमदनगर मध्ये आले. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात व जिल्ह्यातील आजी माजी आमदारांची बैठक घेतली. व त्या बैठकीत महाविकास आघाडीकडून चंद्रशेखर घुले यांच्या नावावर अखेरकार शिक्कामोर्तब करण्यात आले.

परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस आणी कॉंग्रेसला भारतीय जनता पक्षाचा जणु विसरच पडला होतो. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार अहमदनगर मध्ये जिल्हा बँकेची फिल्डिंग लावत असल्याची चर्चा बाहेर येताच भाजपाच्या विखे पाटील पिता पुत्रांनी देखील यंत्रणा राबविण्यास सुरवात केली होती. दुसऱ्या दिवशी निवडणुक असतांना देखील आपण एका रात्रीतून बँक काबीज करू शकतो जणु हा विश्वासच भाजपाच्या नेत्यांमध्ये होता. अनं शेवटी झालें देखील तसेच.

निवडणूकीच्या आदल्यादिवशी म्हणजेच ७ मार्चच्या रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्ह्यातील नेत्यांनी फोन लावला आणी सुरू झाली ती निवडणुकीची रणनिती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढविण्यास परवानगी दिली व त्याची संपूर्ण जबाबदारी महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखेपाटील यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण व त्यांचे चिरंजीव खासदार सुजय विखेपाटील यांनी देखील एका रात्रीतून यंत्रणा फिरवली अनं दुसरा दिवस उजळला तो म्हणजे ८ मार्चचा याच ८ मार्च रोजी पार पाडली जाणारं होती ती म्हणजे बँकेची निवडणुक. विशेष म्हणजे शेवटपर्यंत कोणीच आपल्या समोर विरोधक नाही यां भ्रमात राहणाऱ्या महाविकास आघाडीला अखेच्या क्षणात धक्का बसला ते म्हणजे भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अनं लागलीच निवडणुक घेण्याची तयारी झाली.

माजी आमदार व अहमदनगर जिल्हा बँकेचे किंग मेकर म्हणून संबोधला जाणारा एवढा मोठा नेता उभा राहिला अनं त्या नेत्याला ताकद मिळाली ती विखे पाटील पिता – पुत्र यांची त्यामुळे संचालक देखील गोंधळात पडले.दरम्यान विखे पाटील यांनी विखे पँटर्न वापरत १० मतांच गणितं जुळवत शिवाजीराव कर्डिले यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. बँकेच्या २० संचालकांपैकी १० मते शिवाजीराव कर्डिले यांना तर आघाडीचे घुले पाटील यांना ९ मते मिळाली तर १ मत बाद झाले. अवघ्या १ मतावर शिवाजीराव कर्डिलेंचा विजय झाला.

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बैठकीला न बोलावल्यामुळे अखेर भाजपा नेत्यांचा डोळा उघडला तो म्हणजे ‘मानसन्मानाचा’ अनं खेळ झाला तो एका रात्रीतून अशी प्रतिक्रिया खुद्द नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे.खरं तर जिल्हा बँक एका रात्रीतून काबीज करणारे खरे शिल्पकार हें विखे पिता – पुत्र असून विखें पिता पुत्रांच्या विखे पँटर्नने राज्याच्या विरोधी पक्ष नेता अजित पवार व बाळासाहेब थोरातांना जोर का झटका धीरें से दिला आहे असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही…..!

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *