दिल्ली । झुंझार न्यूज

 

 

भाजपाचे ज्येष्ठ नेते व देशाचे संरक्षण मंत्री मा.श्री. राजनाथसिंहजी यांची अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यात विकसित होत असलेल्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच, अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योगांना चालना देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांना दिली.

 

यासोबतच शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये उभारल्या जात असलेल्या डिफेन्स प्रकल्पांची प्रगती, स्थानिक युवकांसाठी निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी तसेच उद्योगविकासाच्या दृष्टीने असलेली क्षमता याविषयी सकारात्मक संवाद झाला.

या प्रकल्पांना अधिक बळ मिळावे आणि केंद्र सरकारचा पाठिंबा मिळत राहावा, यासाठी मा. राजनाथसिंहजींना शिर्डी औद्योगिक वसाहतीतील डिफेन्स प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देण्याचे निमंत्रण दिले. त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *