मुक्ता ढोणे यांच्या भूदानामुळे हजारवाडीत अंगणवाडीचे थाटात उद्घाटन

 

 

पानोडी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी अंतर्गत असलेल्या हजारवाडी येथील ‘सुळवस्ती-कोळेकरवस्ती’ अंगणवाडीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या अंगणवाडीमुळे सुळवस्ती आणि ढोणेवस्तीवरील चिमुकल्यांचा शिक्षणासाठी होणारा ३ किलोमीटरचा त्रास आता वाचणार असून, त्यांच्या घरापर्यंत ज्ञानाचे दरवाजे खुले झाले आहेत. हक्काची अंगणवाडी मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“addons”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

या अंगणवाडीसाठी जागेचा प्रश्न अत्यंत बिकट झाला होता. मात्र, सामाजिक बांधिलकी जपत मुक्ता म्हाळू ढोणे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून स्वतःची जागा अंगणवाडीसाठी दान (बक्षीस) दिली. त्यांच्या या दातृत्वामुळेच ही सुंदर इमारत उभी राहू शकली. याबद्दल मुक्ता ढोणे यांचा त्यांच्या पतीसह विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, त्यांचे वडील म्हाळू कांडाजी ढोणे यांचाही सन्मान करण्यात आला. म्हाळू ढोणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला.

याप्रसंगी सरपंच गणपत हजारे आणि उपसरपंच विक्रमराजे थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी मंजुरीपासून ते इमारत पूर्ण होईपर्यंत आलेल्या विविध प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींचा त्यांनी पाढा वाचला. सर्व सदस्यांनी एकजुटीने प्रयत्न केल्यामुळेच हा प्रकल्प पूर्णत्वास आल्याचे त्यांनी सांगितले . याप्रसंगी कारभारी हजारे, अंगणवाडी सेविका बेबी खेडकर , वंदना खंडागळे आणि वनिता जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या चंद्रकला भास्कर सूळ, देवराम हजारे, मधुकर सानप, सूर्यभान थोरात, विठ्ठल घोडेकर, सोपान सुळ, भास्कर सुळ, गवाजी कोळेकर, धोंडीबा हजारे, मुक्ता हजारे, सावळेराम रूपनर, शिवलाल कोळेकर, गोंडा कोरडकर, संतोष ढोणे, आनंदा तळेकर, रामा थोरात यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार अंगणवाडी सेविका शिला म्हाळू हजारे यांनी केले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed