मुंबई । झुंझार न्यूज

 

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी श्री छत्रपती शिवरायांची तुलना क्रूरकर्मा टिपू सुलतानशी केल्याचे वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे . व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राती ल जनतेची माफी मागावी अशी मागणी प डॉ विखे पाटील कृषी परिषद मुंबई अध्यक्षा व भारतीय जनता पार्टी माजी महिला सरचिटणीस अनुजा साळवी यांनी केली आहे .

 

सौ अनुजा साळवी यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, श्री छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वाभिमानाचे प्रतीक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत. त्यांच्या महान कार्याची तुलना क्रूरकर्मा टिपूसुलतानाशी करणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे.
मी त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करते आणि त्यांनी तात्काळ संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी करते.

 

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणीही तडजोड करू शकत नाही असे ही सौ अनुजा साळवी म्हणाल्यात.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *