संगमनेर । झुंझार न्यूज

 


नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या कार्याचा ठसा उमटवत भरघोस मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचित नगरसेवक सुधाकरराव सोनवणे आणि सौ. रंजनाताई सोनवणे यांचा संगमनेर येथे भव्य सत्कार करण्यात आला. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख आणि अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. शरयुताई देशमुख यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

 

 

 

सुधाकर सोनवणे आणि रंजनाताई सोनवणे यांनी नवी मुंबईत केलेल्या जनसंपर्कामुळे आणि विकासकामांच्या जोरावर मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना महापालिकेत पाठवले आहे. या विजयाचे औचित्य साधून, त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की, “सोनवणे दांपत्याने आपल्या कामाच्या माध्यमातून नवी मुंबईत मराठी माणसाचा आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद केला आहे. त्यांचा हा विजय त्यांच्या कष्टाचे आणि निष्ठेचे फळ आहे.”

 

 

 

या सोहळ्याला संगमनेर दूध संघाचे संचालक डॉ. प्रमोद पावसे, माणिकराव यादव, अशोकराव भालेराव, डॉ. संदीप पावसे, डॉ. विजय पावसे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थ आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमाला देवस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, उपाध्यक्ष संतोष पावसे, सचिव अनिल गडाख, आण्णासो शिंदे, गणेश गडाख, सौ. उगले मॅडम, गणपत पावसे सर, मेजर नारायण पावसे, सोमनाथ दवंगे, नितीन भालेराव यांच्यासह हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले.

 

 

 

सत्कारार्थी सुधाकर सोनवणे यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना, हा विजय सर्वसामान्य जनतेचा असून यापुढेही जनसेवेचे व्रत अधिक जोमाने सुरू ठेवू, असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून सोनवणे दांपत्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 

 

 


 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *