संगमनेर । झुंझार

संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शिबलापूर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी हजरत शाह शिबली बाबा यांची यात्रा अत्यंत उत्साहात साजरी होणार आहे. या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने माहिती देण्यात आली आहे .


हजरत शाह शिबली बाबा यांच्या यात्रेनिमित्त सोमवार, दिनांक २३ मार्च २०२६ आणि मंगळवार, दिनांक २४ मार्च २०२६ असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


सोमवार, २३ मार्च २०२६ सायंकाळी ७:०० ते रात्री ९:०० या वेळेत गावातून सवाद्य आणि पारंपारिक पद्धतीने ‘संदल’ मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ९:०० ते १२:०० या वेळेत ‘होळीचे पटांगण’ येथे मनोरंजनासाठी सौ मनिषा सिध्देटेककर व रेश्मा नारायणगांवकर यांचा लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


मंगळवार, २४ मार्च २०२६ दुसऱ्या दिवशी सकाळी ९:०० ते १२:०० या वेळेत ‘हजेरी’ हा पारंपारिक कार्यक्रम पार पडणार आहे.

या यात्रेमुळे गावात आनंदाचे वातावरण असून, भाविकांनी आणि नागरिकांनी शांततेत व उत्साहात या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *