संगमनेर । झुंझार न्यूज 

 

देशात होत असलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे दिल्लीत उपस्थित आहेत.

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी भवन येथे काँग्रेस कार्य समितीची बैठक पार पडली यावेळी देशभरातील महत्त्वाचे 21 नेते उपस्थित होते पक्षाध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, के सी वेणुगोपाल, महाराष्ट्राचे मा. प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात, यांच्यासह विविध महत्त्वाचे नेते बैठकीसाठी उपस्थित होते.

काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटी ही देशातील अत्यंत महत्त्वाची असून यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी ,राजीव गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग राहिला आहे. देशाची धोरणात्मक राजनीति ठरवण्याबरोबर समता ,बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी सीडब्ल्यूसी चे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

अमेरिका इराण युद्धामध्ये देशाची फसलेली परदेश नीती, वाढलेली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, याचबरोबर मध्ये जातीय तणाव, धार्मिक ध्रुवीकरण, पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्या.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *