{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

१६ डिसेंबरला शानदार वितरण सोहळा

 

श्रीरामपूर । झुंझार न्यूज

 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून दिला जाणारा मानाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ यंदा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी ही घोषणा केली.

 

 

 

१६ डिसेंबर २०२६ ला भव्य सोहळा आणि ‘भिमसूर्य क्रांती’ कार्यक्रम


येत्या गुरुवार, दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता रेल्वे स्टेशनसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रांगणात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ‘भिमसूर्य क्रांती’ हा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम असणार आहे. याच दिमाखदार सोहळ्यात डॉ. सुजय विखे पाटील यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्यासाठी शहरासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, भाजपचे दीपक पटारे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल, राजाभाऊ कापसे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, पक्ष प्रतोद वैशालीताई चव्हाण, नगरसेवक आशिष धनवटे, भाजप तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक दीपक चव्हाण, नगरसेवक मनोज लबडे, नगरसेविका आशा रासकर, नगरसेवक संजय बांगर आदी मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.

Oplus_131072

हा पुरस्कार सोहळा आणि भीमगीतांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव बागुल, सचिन ब्राह्मणे, विशाल सुरडकर, प्रकाश ढोकणे, चरण त्रिभुवन, संजय रूपटक्के, रॉकी लोंढे, संतोष मोकळ, रमादेवी धीवर, संजय बोरगे, किशोर ठोकळ, अमोल काळे, दादासाहेब बनकर, अर्जुन शेजवळ यांच्यासह स्मारक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

श्रीरामपूरकरांनी या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *