{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते उद्घाटन; जलसंधारण ही लोकचळवळ व्हावी, असे आवाहन

अकोले । झुंझार न्यूज

जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, गोदावरी मराठवाडा आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-२०२६’ चा शुभारंभ अकोले येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते या पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात येणार असून, याद्वारे जलसंधारणाबाबत मोठी जनजागृती केली जाणार आहे.

याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले की, “ही जनजागृती यात्रा अकोले तालुक्यात येत आहे, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. तिचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाचे कार्य अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. जलव्यवस्थापनाची ही जबाबदारी केवळ अधिकाऱ्यांची नसून, यात शेतकरी आणि कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे.”
विखे पाटील यांच्यासारखे कार्यक्षम नेतृत्व मिळाल्यामुळे विभागाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या १५ दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे
१६ एप्रिल: जलसंपदा कर्मचारी प्रशिक्षण.
१७ एप्रिल: कार्यालय स्वच्छता आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग.
१८ व १९ एप्रिल: शेतकरी संवाद आणि जागतिक महिला शेतकरी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम.
२० ते २४ एप्रिल: भूसंपादन समस्यांचे निराकरण, कालवा स्वच्छता, नदी प्रदूषण नियंत्रण, उपसा सिंचन तक्रार निवारण आणि पीक पद्धती बदलाबाबत मार्गदर्शन.
२५ ते २९ एप्रिल: ‘गोदावरी ते नर्मदा’ जलदिंडीचे आयोजन आणि विद्यापीठांसोबत संवाद.
३० एप्रिल: जिल्हा मुख्यालयी महिला मेळावा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार करून सांगता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिजामाता इग्लीश मेडीयम स्कूलच माजी प्राचार्यशेवाळे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक अभियंता जगदीशदारोळे, सहाय्यक अभियंता योगेशजोर्वेकर, सहाय्यक अभियंता आसिफशेख आणि शाखा अभियंता अमोलचिखले यांनी केले.

या मोहिमेत ‘चला, पाण्याचे करूया संवर्धन.. वसुंधरेचे होईल रक्षण..!’ असा नारा देत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंपदा  विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *