{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून ५ एम व्ही ए वरून १० एमव्हीए; क्षमता वाढ

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ वीज उपकेंद्रावरील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून ५ एमव्हीएवरून १० एमव्हीए करण्यात आली असून, या परिसरातील विजेचा प्रश्न लक्षात घेता स्थानिक महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ट्रांसफार्मरचा शुभारंभ करण्यात आला

 

 

 

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ परिसरात वाढत्या वीज मागणीमुळे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी दाबाचा प्रश्न गंभीर झाला होता. याचा सर्वाधिक फटका या परिसरातील शेतकऱ्यांना बसत होता. शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्याने पिकांवर परिणाम होत होता. ही शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ आमदार अमोल खताळ यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला.

 

 

त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे आता धांदरफळ व परिसरातील गावांना वीजपुरवठा सुरळीत होणार असून आता या नवीन ट्रांसफार्मरमुळे विज खंडित न होता पूर्ण दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत होणार असल्याची भावना मिलिंद खताळ, उमेश कोकणे, बाळासाहेब खताळ, अमोल खताळ,सुरज खताळ,पियुष ठोंबरे. सर्वेश गुंजाळ,विकास खताळ यांच्या सह स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. विज ट्रांसफार्मर क्षमतेत वाढ केल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांना धांदरफळ व परिसरातील नागरिकांनी धन्यवाद दिले आहे हे विजेचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्या साठी धांदरफळ वीज उपकेंद्राचे महादेव गुरसाळी,सचिन गभणे, कैलास कुदळ,अनिल डुबे यांनी विशेष परिश्रम घेतले

 

.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *