पुणे । झुंझार न्यूज
पुणे येथील समर्थ सणस मैदानावर नुकत्याच संपन्न झालेल्या ‘इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन’ (IEDSSA) तर्फे आयोजित राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये काष्टी (श्रीगोंदा) येथील परिक्रमा तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी शेंडगे हिने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदक आपल्या नावे केले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत परिक्रमा पॉलिटेक्निकचे कु. वैष्णवी शेंडगे, कु. अविनाश गावडे आणि कु. अनुराधा धुमाळ या तीन खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत वैष्णवी शेंडगे हिने आपल्या वेगवान कौशल्याचे प्रदर्शन करत द्वितीय स्थान मिळवले. या यशामुळे केवळ महाविद्यालयाचेच नव्हे तर जिल्ह्याचे नावही क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर उंचावले आहे.
खेळाडूंच्या या घवघवीत यशाबद्दल परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक व माजी मंत्री बबनराव पाचपुते, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव तथा आमदार श्री. विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते, अकॅडमी डायरेक्टर सौ. इंद्रायणी पाचपुते यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले.

तसेच मुख्य अतिरिक्त कार्यकारी अधिकारी प्रा. अनिल पुंड, अतिरिक्त अकॅडमी डायरेक्टर संजिव कदमपाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी, इंजिनिअरिंगचे प्राचार्य मोहन धगाटे, एम.बी.ए. डायरेक्टर डॉ. सुदर्शन गिरमकर, फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. पांडुरंग इथापे यांनीही खेळाडूंचे कौतुक करत त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी खेळाडूंना परिक्रमा तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी आणि शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अशोक राहिंज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वैष्णवीच्या या यशामुळे परिक्रमा संकुलात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

