संगमनेर शहराच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध, नागरिकांचा सहभाग वाढला
संगमनेर । झुंझार न्यूज
महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेने अत्यंत चांगले काम केले आहे. संगमनेर शहरातील जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून पुढील वीस वर्षांचे नियोजन ठेवून आधुनिकता आणत संगमनेर शहराच्या शाश्वत विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले असून नगरपालिकेच्या पहिल्या शंभर दिवसातील महत्त्वपूर्ण पायाभूत ठळक कामे करून विविध कामांचा लेखाजोखा त्यांनी मांडला आहे.

संगमनेर नगरपालिकेच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी 3 जानेवारी 2026 ला पदभार घेतल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सादर केला यावेळी माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष सौ.डॉ मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, नगरसेवक सौ.सीमाताई खटाटे, भारत बोऱ्हाडे, सौ अर्चना दिघे, सौरभ कासार, सौ शोभाताई पवार ,सौ प्राची काशीद ,किशोर पवार, सौ अनुराधा सातपुते, सौ वनिता गाडे, गजेंद्र अभंग, सौ मालती डाके, नितीन अभंग, सौ दिपाली पांचारीया, गणेश गुंजाळ ,अमजद पठाण, श्रीमती विजया गुंजाळ ,शेख शकीला, सरोजना पगडाल, डॉ दानिश, किशोर टोकसे ,सौ प्रियांका शहा ,शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, मुजीब खान पठाण, सोमेश्वर दिवटे, रचना मालपाणी , जावेदखान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत पहिल्या शंभर दिवसांच्या कामकाजाची माहिती देताना आमदार तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने 1991 पासून नागरिकांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या आहेत. झालेल्या निवडणुकीमध्ये संगमनेर 2.0 यासाठी जनतेचा जाहीरनामा केला आणि तो पूर्ण करण्यासाठी आपण काम करत आहोत.शहरातील नागरिकांनी मोठा विश्वास दाखवला असून 30 पैकी 27 नगरसेवक व राज्यातून सर्वाधिक मताधिक्याने नगराध्यक्ष निवडून आले आहेत. हा जनतेचा विश्वास असून आपण तो सार्थ ठरवणार आहोत. पहिले शंभर दिवस हे पायाभरणीचे ठरले आहेत
मागील चार वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासन असल्याने प्रशासकीय कामात मोठ्या अडचणी होत्या विकास कामे ठप्प झालेली होती. अरेरावी, बेशिस्तपणा, अतिक्रमणे यांच्यामध्ये मोठी वाढ झाली होती. विकास कामांना खीळ बसली होती. नवीन पदाधिकाऱ्यांनी कारभार हातात घेतल्यानंतर अवघे तीन ते चार लाख रुपये शिल्लक होते.
अशा अडचणीच्या परिस्थितीत विभाग वाईज 39 बैठका घेऊन प्रशासकीय कामाला गती दिली यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी सुरक्षा रक्षक दल निर्माण केले जे राज्यासाठी दिशादर्शक ठरले आहे कायद्यास व्यवस्था मध्ये मदत करत आहेत. फ्लेक्समुक्त शहरासाठी काम सुरू आहे मात्र काही जण लावतात त्यांच्यावरही कारवाई होईल तक्रार ॲप निर्माण झाला असून मागील तीन महिन्यात 317 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे याचबरोबर नगराध्यक्ष वारू केली असून त्यामधून प्रशासकीय कामाला गती मिळाली आहे महिलांसाठी दहा इ टॉयलेट देण्यात आले आहेत शहरांमध्ये पूर्ण दाबाने सुरळीत पाणीपुरवठा होत आहेत सध्या 42°c तापमानामध्ये सुद्धा सर्व नागरिकांना चांगले पाणी मिळत आहेत धूळ मुक्त शहरासाठी दोन गाड्या नवीन मंजूर करून घेतल्या आहेत तसेच कचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन आराखडा आखण्यात आला आहे.
याचबरोबर चार सर्वसाधारण सभेमधून 105 निर्णय घेण्यात आले असून हायटेक बस स्थानकात मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे त्यांचा पूर्णकृती पुतळा, संविधान भिंत, शहीद स्मारक, शंभर फूट तिरंगा, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण कृती पुतळे याचबरोबर यंग नॅशनल ग्राउंड व गंगामाई घाटावर हेल्थ क्लब अशा विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून शहरातील 2000 नागरिकांना घरे देण्याची प्रक्रिया सुरू आहे अतिक्रमण स्टॉल धारकांना पर्यायी जागा दिली जात असून प्रशासकीय कामात सुधारणा केली जात आहे सध्या नगरपालिकेमध्ये 180 कायमस्वरूपी कर्मचारी असून यामध्ये 90 सफाई कर्मचारी आहेत तर 199 कंत्राटी कर्मचारी आहेत शहरातील तीर्थस्थळांना जोडणारे सोमेश्वर कॉरिडॉर उभारण्यात येणार असून प्रशासकीय कामांमध्ये आधुनिक प्राणहिणीचा वापर केला जात आहे राज्यामध्ये कुठेही नाही असे काम संगमनेर शहरांमध्ये होत आहे यामध्ये जनतेचे सहकार्य सुद्धा महत्त्वाचे आहे. प्रशासकीय काळामधील सुमारे 15 कोटी देणे थकबाकी असून सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने यावर्षी चांगली वसुली झाली आहे शासनाच्या विविध योजनांमधून निधी मिळवण्यासाठी आपण कटिबद्ध असून येणाऱ्या काळामध्ये एसटीपी प्लांट पूर्ण केला जाणार असल्याचे सांगताना शहरातील विविध विकास कामांबाबत त्यांनी माहिती दिली.
तर नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी प्रास्ताविकामध्ये सर्व नागरिक यांच्या सहकार्यातून संगमनेर 2.0 ही संकल्पना पुढे नेण्यासाठी सर्व नगरसेवक प्रशासकीय अधिकारी कटिबद्ध असून आगामी काळामध्ये संगमनेर शहरांमध्ये मूलभूत बदल सर्वांना दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी केले.
100 दिवसातील ठळक विकास कामे
महिलांच्या सुरक्षे करता सुरक्षारक्षक दल ,फ्लेक्समुक्त शहरासाठी 99% अंमलबजावणी, तक्रार ॲप कार्यान्वित, कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य ,महिलांसाठी 10 इ टॉयलेट, शहरात उन्हाळ्यातही स्वच्छ व पूर्ण दाबाने मुबलक पाणी ,दोन विभागीय क्षेत्रीय कार्यालय ,धुळमुक्त शहरासाठी दोन गाड्यांची नवीन मंजुरी ,कचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन आराखडा याचबरोबर प्रस्तावित सोमेश्वर कॉरिडोर यांसह विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत.
———————

शहरांमध्ये विविध महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे बसून बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा परिसर अत्यंत सुंदर बनवण्यात येणार असून जाणता राजा ते राजपाल हा मॉडेल रोड तयार करण्यात येणार आहे. याचबरोबर अतिक्रमण काढून शहरात नव्याने तयार होणारे सर्व रस्ते हे उच्च गुणवत्तेचे असतील यासाठी नगरपालिका काम करेल असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.

