संगमनेर । झुंझार न्यूज

 

 या उपक्रमाअंतर्गत अकोले तालुक्यातील टाहाकरी येथील प्राचीन जगदंबा मंदिरास अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजक सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय इतिहास विभाग व जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल हे होते. तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपण्याच्या व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.  

अकोले तालुक्यातील चार महत्त्वपूर्ण मंदिरे – अमृतेश्वर मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, जगदंबा मंदिर व सिद्धेश्वर मंदिर – यांपैकी टाहाकरी येथील प्राचीन जगदंबा मंदिरास मंडळाच्या सदस्यांनी भेट दिली. या मंदिरातील अष्टभुजा महिषासुरमर्दिनी देवीची मूर्ती, शेजारील गण व शिवलिंगाची स्थापत्यशैली अत्यंत देखणी असून, उपस्थितांनी शिल्पकलेचे बारकाईने निरीक्षण केले.

या वेळी मंदिराची ऐतिहासिक व शिल्पकलात्मक माहिती डॉ. उल्हास कुलकर्णी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व रसाळपणे उपस्थितांना दिली. या हेरिटेज वॉकचे संयोजक प्राध्यापक विठ्ठलराव शेवाळे यांनी अकोले व संगमनेर तालुक्याच्या मागील काही दशकांतील इतिहासावर प्रकाश टाकला. या सहलीचे काटेकोर नियोजन प्रा. शेवाळे सर यांनी केले.


या उपक्रमासाठी डॉ. माणिकराव शेवाळे यांनी जिजामाता इंग्लिश मिडियम स्कूलच्या स्कूलबसची मोफत सोय उपलब्ध करून दिली. प्रकल्प प्रमुख रमेश थोरात सर यांच्या पुढाकाराने या हेरिटेज वॉकची सुरुवात झाली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वी होत आहेत.  

सहलीचा तपशील: सकाळी ठीक ७:१५ वाजता संगमनेर बस स्थानकातून सहलीस प्रारंभ झाला. सकाळी ९:०० वाजता टाहाकरी येथे पोहोचल्यानंतर मंदिराची सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व सहभागी सदस्यांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. याबद्दल देवस्थानचे विश्वस्त श्री. एखंडे यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. परतीचा प्रवास सकाळी ११:३० वाजता सुरू होऊन दुपारी १:१५ वाजता सर्व सदस्य संगमनेर येथे सुखरूप परतले.


या उपक्रमामुळे संगमनेर व अकोले तालुक्यातील प्रेक्षणीय, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती सर्व सदस्यांना झाली. या यशस्वी उपक्रमात   संयोजक प्रा. विठ्ठलराव शेवाळे, डॉ. माणिकराव शेवाळे, प्रकल्प प्रमुख रमेश थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ इतिहास विभागातील प्रा. श्रीकांत डापसे प्रा. कांबळे दत्तात्रय संगमनेर अकोले तालुक्यातील अभ्यास प्रेमी इतिहास विभागातील विद्यार्थी उपस्थित होते उपस्थितांनी आजचा उपक्रम अत्यंत आनंददायी, माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त केली.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed