ऑस्ट्रेलिया अभ्यास दौऱ्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम सुरू

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

सर्वसामान्य नागरिकांचे वैयक्तिक किंवा सार्वजनिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने काम करणारे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नुकताच ऑस्ट्रेलियाचा अभ्यास दौरा केला असून या अभ्यास दौऱ्यानंतर संगमनेर मध्ये आल्यानंतर तालुक्यातील व जिल्ह्यातून नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली. याचबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी प्राधान्य दिले.

वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट च्या वतीने दहा दिवसांचा ऑस्ट्रेलियाचा अभ्यास दौरा महाराष्ट्राचे मा. कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व शिष्टमंडळाने पूर्ण केला. या अभ्यास दौऱ्यामध्ये या शिष्टमंडळाने शुगर रिसर्च ऑस्ट्रेलियाच्या अत्याधुनिक आयरिस प्रयोगशाळेला भेट दिली. यामध्ये ऊस जीनोमिक्स, रोग निदान, टिशू कल्चर, कीड व रोग व्यवस्थापन ,मृदा आणि पोषण विश्लेषणासंबंधाने माहिती घेतली याचबरोबर द युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड  येथील स्पीड ब्रीडिंगची ही पाहणी केली. तसेच ऑस्ट्रेलियातील आधुनिक साखर कारखान्यांना ही भेट देत ऊस गाळप, ऊर्जा निर्मिती, बगेस पुनर्वापर, स्वयंचलित मिल व्यवस्थापन याबाबतची माहिती घेतली.

या अभ्यास दौऱ्यानंतर  वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे संगमनेर मध्ये आले यानंतर संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिक याचबरोबर युवक आणि जिल्ह्यामधील अनेक कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली.

यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विविध नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राधान्य दिले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीने नागरिकांमध्ये मोठे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. सुदर्शन निवासस्थान, कारखाना, यशोधन यांसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती यानंतर लोकनेते थोरात यांनी तालुक्यांमधील विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या.

प्रश्न कोणताही असो साहेब सोडवतातच – घुले

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा परिवार मानला आहे तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी असतात प्रत्येकाच्या  अडचणी सोडवतात. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये डॉ जयश्रीताई थोरात यांनी प्रत्येक कार्यक्रमांना उपस्थिती दिली. अभ्यास दौरा आटपून साहेब आल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असल्याचे सावरगाव घुले येथील माजी सरपंच अर्जुन लहानु घुले यांनी म्हटले आहे

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed