{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

शिर्डी । झुंझार न्यूज

.
भारतीय संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने अहमदनगर जिल्ह्यात एक मोठे पाऊल टाकले जात आहे. शिर्डी जवळील सावळीविहीर खुर्द (एमआयडीसी) येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक “क्षेपणास्त्र संकुल व तोफगोळा (आर्टिलरी शेल) उत्पादन प्रकल्पाचा” भव्य लोकार्पण सोहळा येत्या शनिवारी, दि. २३ मे २०२६ रोजी संपन्न होणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री मा. श्री. राजनाथ सिंह यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून, हा प्रकल्प देशाच्या संरक्षण सिद्धतेत मोलाची भर घालणार आहे.

वार्षिक ५ लाख तोफगोळ्यांची निर्मिती क्षमता

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची उत्पादन क्षमता. या अत्याधुनिक प्रकल्पातून दरवर्षी ५ लाख आर्टिलरी शेल (तोफगोळे) तयार केले जाणार आहेत. यामुळे भारतीय लष्कराला लागणाऱ्या दारूगोळ्याचा पुरवठा अधिक वेगाने आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होण्यास मदत होईल. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार आहे.

या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) मा. श्री. जनरल अनिल चौहान, उद्योग मंत्री मा. ना. श्री. उदय रविंद्र सामंत , जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील , डॉ सुजय विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा शनिवारी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

संरक्षण उत्पादनांचे भव्य प्रदर्शन

लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून दि. २३ आणि २४ मे २०२६ असे दोन दिवस सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संरक्षण क्षेत्रातील विविध उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्रे (Missiles), रॉकेट आणि लष्करी उपकरणांचे दर्शन नागरिकांना घेता येणार आहे. तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगती जवळून पाहण्याची ही दुर्मिळ संधी असणार आहे.

शिर्डी आणि परिसरातील नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी या भव्य प्रदर्शनाला आणि लोकार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निबे ग्रुप व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून, शिर्डी एमआयडीसी आता देशाच्या संरक्षण नकाशावर ठळकपणे उमटणार आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *