संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

बिताका धरणातील पाण्यातून आढळा धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी जलसंपदा विभागाने ३०कोटी रुपयांची तरतूद केली आली असून, यासाठीच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले असल्याची माहीती जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

 

उर्ध्व प्रवरा डावा कालव्यावरील काटनियामक आणि अतिवाहकाच्या पूर्ण झालेल्या कामाचा लोकार्पण सोहळा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.आ.अमोल खताळ भाजपा मंडल अध्यक्ष श्रीकांत गोमासे दिलीपराव शिंदे आबासाहेब थोरात वैभव लांडगे जनार्दन आहेर डॉ सोमनाथ कानवडे जलसंपदा विभागाचे अभियंता अमोल कवडे प्रदीप हापसे प्रमोद माने यांच्यासह
शेतकरी कार्यकर्ते महीला उपस्थित होत्या या कामासाठी चार कोटी ४६लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.पाच महीन्यात काम पूर्ण झाले असून या प्रणालीमुळे जवळे कडलग वडगाव लांडगा व धांदरफळ बुद्रुक गावांना पाण्याचा लाभ मिळेल.धामोडी नाल्यावरील सात बंधारे भरले जातील शेतकर्यांना सिंचनाचा लाभ होईल.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,निळवंडे प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळवून देण्याचा शब्द मी दिला होता.तो आज पूर्ण होत असल्याचे समाधान आहे.यापुर्वी निळवंडेच्या विषयावरून फक्त आम्हाला बदनाम केले गेले.मात्र महायुती सरकारमुळे पहील्या सहवीस किलोमीटरच्या कालव्यांची काम मार्गी लागली.याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्व.मधुकर पिचड यांचे आहे.

आढळा खोर्यातील पाण्याची तूट भरून काढायची असेल तर बिताका धरणातून पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही.यासाठी सर्व्हेक्षण सुरू झाले असून २०लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.सर्व्हेक्षण पूर्ण होताच आढळा खोर्यातील कामाची सुरूवात करण्याची जलसंपदा विभागाची तयारी असून यासाठी ३०कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

मंत्री विखै पाटील यांनी सांगितले की,आज लोकार्पण होत असलेल्या कामाचा पाठपुरावा आ.अमोल खताळ यांनी सातत्याने केला.कामाची पूर्तता सुध्दा प्रवरेच्या माजी विद्यार्थ्याने केली त्यामुळेच प्रवरेशिवाय पर्याय नाही.या तांत्रिक कामामुळे शेती पीकाला मोठा फायदा होईल.

या भागातील गावांना निळवंडे आणि आढळातील पाण्याचा दुहेरी लाभ मिळून देणार याची खात्री देवून मंत्री विखे यांनी सांगितले की महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे हे अनेक निर्णयातून दाखवून दिले आहे.

 

आ.अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात आजचा दिवस आंनदाचा असून,मोठे स्वप्न या कामामुळे पूर्ण होत आहे.यापुर्वी फक्त पाणी पाहात राहायची वेळ होती.निवडणुका आल्या की आश्वासन मिळायची महायुती सरकार मात्र करून दाखवणारे सरकार आहे.काहीकडे आता कार्यक्रम उरलेले नाहीत.केवळ राजकारण करून दिशाभूल सुरू असल्याची टिका त्यांनी केली.

आम्हाला कालवे माहीत नाही आशी टिका करणार्या विरोधकांचा समाचार घेताना आ.खताळ म्हणाले की,म्हाळादेवी पासूनचा इतिहास आम्हाला माहीती आहे.तुम्हाला पाणी द्यायचेच नव्हते हेच खरे सत्य आहे.

 

तालुक्यात सर्वाधिक नविन रोहीत्र बसवविण्याचे काम झाले असून,तळेगाव साकूर भागातही पाण्याचे स्वप्न लवकरच महायुती पूर्ण करेल जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे यासाठी मोठे सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *