{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

आश्वी । झुंझार न्यूज

येथील ‘बालपण इंग्लिश मिडिअम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात योगासनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्राणायाम, सूर्यनमस्कार, भुजंगासन आणि इतर योगासनांची शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिके सादर केली. योगामुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि बौद्धिक विकासही होतो, हे यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पटवून दिले. बदलत्या जीवनशैलीत योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.


केवळ प्रात्यक्षिकेच नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल अधिक सखोल जाणीव निर्माण व्हावी, यासाठी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये:
१. निरोगी जीवनाची गुरुकिल्ली – योग
२. शालेय जीवनात योगाचे महत्त्व
३. योगाभ्यासाचे आरोग्यासाठी महत्त्व
या तीन विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार निबंधाच्या माध्यमातून मांडले. विद्यार्थ्यांनी अतिशय समर्पक आणि अभ्यासपूर्ण निबंध लेखन करून या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 योग हा जीवनाचा अविभाज्य भाग बनावा – सौ. सोनाली मुंढे

या प्रसंगी शाळेच्या प्रमुख सौ. सोनाली मुंढे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, “योगामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, आत्मविश्वास आणि शारीरिक आरोग्य सुधारते. शालेय वयापासूनच योगाची सवय लागल्यास भविष्य उज्ज्वल होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज योगासने करण्याचा संकल्प करून योग हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा.”


कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोकुळ पाबळ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे बारकावे आणि त्याचे फायदे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगाच्या या विशेष उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *