{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

योग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

.
आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात निरोगी राहण्यासाठी योग हा सर्वोत्तम पर्याय असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योग करणे ही काळाची गरज असल्याचा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला.

 

संगमनेर शहरातील गणेशनगर परिसरात पतंजली योग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या योग दिन कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक-युवती उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, भारताने जगाला दिलेली योगाची अमूल्य देणगी आज संपूर्ण जग स्वीकारत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योगाचे महत्त्व अधिक व्यापक स्तरावर पोहोचत आहे. प्रत्येक नागरिकाने निरोगी आयुष्यासाठी योगाचा अंगीकार करणे आवश्यक आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण विविध शारीरिक व मानसिक तणावांना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याला निरोगी ठेवणारी जीवनशैली आहे. नियमित योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, मानसिक एकाग्रता सुधारते तसेच अनेक आजारांपासून संरक्षण मिळते, असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

आमदार खताळ यांचा संकल्प: दररोज योग करूया…

 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी त्यांच्या निवासस्थानी विविध योगासने व प्राणायाम केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त आणि ऊर्जावान राहण्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे. या योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी दररोज आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी केले.

……………………………………………………

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *