केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे निवेदन

 

मुंबई । झुंझार न्यूज 

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण देशात अनेक ठिकणी पुतळे उभारण्यात आलेले आहेत. राज्यात आणि देशातील अनेक जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हयातील महत्वाची ठिकाणी, रुग्णालय, शासकीय कार्यालये, अशा अनेक ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत. देशात असा एकही जिल्हा नसेल तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही, मात्र नवी मुंबई सारख्या प्रगत शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे.

प्रशासन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला जागा देत नाही याकडे लक्ष वेधत रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना निवेदन देवून नवी मुंबईत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला पाहिजे अशी मागणी केली.

 

नवी मुंबईतील बेलापुर येथे कोकण भवन समोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी प्रशासनाने जागा द्यावी अशी नवी मुंबईतील आंबेडकरी जनतेची मागणी आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.त्यांचा नवीमुंबई या शहरामध्ये पुतळा उभारला पाहिजे अशी आग्रहाची मागणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केली. यावर नवी मुंबईमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार आहोत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत.नवी मुंबईत कोकण भवन समोर, बेलापुर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारकडुन जागा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. याबाबत आपण जातीने लक्ष देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या मागणीकडे लक्ष वेधणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खरे; बाळासाहेब मिरजे; युवक जिल्हा अध्यक्ष यशपाल ओव्हाळ; एल आर गायकवाड टिळक जाधव; अभिमान जगताप;अशोक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *