समनापुर येथील शिबिरात ६०० जणांना लाभ

इरेकाठी । झुंझार न्यूज

 

एसटी स्मार्ट कार्ड योजनेचा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील यांनी केले. तालुक्यातील समनापुर येथील ग्रामपंचायतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एसटी स्मार्ट कार्ड शिबिराप्रसंगी त्या बोलत होत्या. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ६०० महिला व पुरुषांनी या एसटी स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ घेतला.


भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वात एसटी स्मार्ट कार्ड शिबिर आयोजित केले होते. या वेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.‌

Oplus_131072

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाध्यक्ष दिपालीताई वाव्हळ, भाजपा तालुका अध्यक्ष (दिव्यांग ) सुरेश दळवी, लहानु चाबुकस्वार, मा. सरपंच भाऊसाहेब शेरमाळे, म्हतु शेरमाळे, रणजीत जाधव, संपत गेठे, संदीप शेरमाळे, एकनाथ शेरमाळे अबु इनामदार, राजू गायकवाड, सुनील चांडे, मच्छिंद्र शेरमाळे, राजेश शेरमाळे, रमेश भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी समनापुर गावातील महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत या योजनेचा लाभ घेतला.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *