शिर्डी मतदारसंघातील रहिमपूर (ता. संगमनेर) येथील विखे पाटील परिवाराचे अत्यंत विश्वासू आणि खंदे समर्थक सचिन रघुनाथ शिंदे यांच्यावर भारतीय जनता पार्टीने मोठी जबाबदारी सोपवली आहे. सचिन शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या अहिल्यानगर (उत्तर) जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांनी सचिन शिंदे यांना निवडीचे अधिकृत पत्र नुकतेच प्रदान केले.
सचिन शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि पक्षवाढीसाठी मोठे योगदान दिले आहे. विशेषतः उत्तर जिल्ह्यातील युवक वर्गाला संघटित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. रहिमपूर गावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी शासन दरबारी आणि विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला आहे.
केवळ राजकारणच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही सचिन शिंदे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, बचत गटातील महिलांसाठी स्वखर्चाने ‘देवी दर्शन’ सहलींचे आयोजन करणे यांसारखे उपक्रम ते राबवत असतात. तसेच जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या आणि युवकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी सचिन शिंदे नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. आदिवासी दिन उत्साहात साजरा करणे, समाजाचे मेळावे आयोजित करणे आणि गरजू आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या याच अष्टपैलू कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
सचिन शिंदे यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय दादा विखे पाटील, संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल भाऊ खताळ, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर, रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री ताई विखे पाटील यांसह विखे पाटील परिवारातील सदस्य आणि भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले .