{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

अहिल्यानगर येथे ५ जुलै रोजी भव्य गौरव सोहळा; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रमुख उपस्थिती

 

 

आश्वी | झुंझार न्यूज

 

 

महाराष्ट्रातील सरपंचांच्या न्यायासाठी आणि गावांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ’ या संघटनेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय समाजभूषण सन्मान २०२६’ दैनिक पुढारी व झुंजार न्यूजचे पत्रकार राजेश रामचंद्र गायकवाड यांना जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

येत्या रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता, अहिल्यानगर येथील सावेडी रोडवरील ‘माऊली संकुल सभागृह’ येथे हा भव्य राज्यस्तरीय सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.

हा सोहळा सरपंच सेवा संघाचे संस्थापक तथा चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ग्रामसेवक युनियनचे नेते एकनाथराव ढाकणे, यादवराव पावसे पाटील आणि सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार यांच्या शुभहस्ते गायकवाड यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

राजेश गायकवाड यांनी अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने पत्रकारिता क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. सामान्यांचे प्रश्न मांडतानाच त्यांनी सामाजिक हित जपण्याचे काम केले आहे. त्यांच्या या उत्तुंग कामगिरीचा आणि धडपडीचा गौरव करण्यासाठी सरपंच सेवा संघाच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ ही ISO प्रमाणित आणि निती आयोग नोंदणीकृत संघटना असून, प्राप्तीकर सवलत (80G/12A) प्राप्त असलेली राज्यातील एक मोठी संघटना आहे. “गावांचा विकास हाच सरपंच संघटनेचा ध्यास” हे ब्रीदवाक्य घेऊन ही संघटना रोहित पवार (प्रदेशाध्यक्ष), बाबासाहेब पावसे (सरचिटणीस), अमोल शेवाळे (संपर्क प्रमुख) आणि प्रविण कडाळे (कायदेशीर सल्लागार) यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.

राजेश गायकवाड यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकारिता क्षेत्रासह संगमनेर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *