आश्वी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील शिबलापुर जि. प. प्राथमिक शाळा, येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. विनायक शिवराम आव्हाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सिद्धार्थ शिवाजी आव्हाड व भाग्यश्री अशोक आव्हाड यांनी सुमारे ₹१५,००० किमतीचे वह्या, पेन, पट्टी, राजा पाटी, खोडरबर आणि शिसपेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य भेट देऊन समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.


यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी विनायक आव्हाड व त्यांच्या पत्नी नलिनी शिवाजी आव्हाड उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल मुन्तोडे, शिबलापूरचे सरपंच प्रमोद बोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच दिलावरभाई शेख, माजी सरपंच एकनाथ नागरे, बाळासाहेब पाबळ, बाळासाहेब मुन्तोडे, मधुकर मुन्तोडे, रसूल शेख, रोहिदास म्हस्के, पालक प्रतिनिधी सुभाष नागरे, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.


मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून उपस्थितांनी आव्हाड कुटुंबीयांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.


यावेळी शाळेच्या शिक्षिका रोहिणी राऊत, शकुंतला उगलमुगले व रेखा गोसावी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी उपस्थित मान्यवर, दातृत्व दाखविणाऱ्या आव्हाड कुटुंबीयांचे आणि सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *