समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या परंपरेनुसार, सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य (स्वराज्य) यांच्या वतीने देण्यात आला मानाचा “राज्यस्तरीय समाजभूषण सन्मान २०२६” संगमनेर ( झरेकाठी ) येथील पत्रकार सोमनाथ भागवत डोळे यांना प्रदान करण्यात आला .
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सोमनाथ डोळे हे दैनिक सार्वमत, दैनिक प्रभात, दैनिक राष्ट्र सह्याद्री, दैनिक नायक आणि दैनिक सार्व मंथन अशा विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून करत आहेत. त्यांच्या या संघर्षाचा, जिद्दीचा आणि समाजहितार्थ असलेल्या धडपडीचा यथोचित सन्मान करण्यासाठी सरपंच सेवा संघाच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. व पुरस्कार प्राधान करण्यात आला
हा भव्य गौरव सोहळा रविवार, दिनांक ०५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता, अहिल्यानगर येथील सावेडी रोडवरील माऊली संकुल सभागृहात संपन्न झाला.
सोहळ्यासाठी सरपंच सेवा संघाचे संस्थापक तथा संघटित चळवळीचे नेते मा. बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते सौंदाळा सरपंच शरद आरगडे यांच्या शुभहस्ते सोमनाथ डोळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मा. यादवराव पावसे पाटील आणि सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. रोहित संजय पवार , स्वप्निल पाटील,जयदीप तोंडे,अभिनव वाणी,प्राध्यापक बाळासाहेब वाघमारे, सुहास वाणी,राहुल वाणी,डॉक्टर नवनाथ वाणी, पोपट वाणी पत्रकार राजेश गायकवाड यांच्या उपस्थित संपन्न झाला
या निवडीबद्दल सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे, संपर्क प्रमुख अमोल शेवाळे, कायदेशीर सल्लागार प्रविण कडाळे आणि राज्यातील सरपंच बांधवांनी सोमनाथ डोळे यांचे अभिनंदन केले .