{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

अहिल्यानगरमध्ये सरपंच सेवा संघाचा भव्य गौरव सोहळा; सामाजिक कार्याचा आणि निर्भीड लेखणीचा गौरव

अहिल्यानगर । झुंझार न्यूज

समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून आपल्या लेखणीच्या माध्यमातून परिवर्तनाची नांदी घडवणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा सरपंच सेवा संघाने कायम राखली आहे. सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य (स्वराज्य) यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय समाजभूषण सन्मान २०२६” यंदा संगमनेर (पानोडी) येथील ज्येष्ठ पत्रकार राजेश रामचंद्र गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.

अहिल्यानगर येथील सावेडी रोडवरील माऊली संकुल सभागृहात रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी हा भव्य गौरव सोहळा अत्यंत उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

राजेश गायकवाड हे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘दैनिक पुढारी’ या अग्रगण्य वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी केवळ बातम्या न लिहिता जनसामान्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. ग्रामीण भागातील विकासकामे, तळागाळातील समस्या आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने प्रहार केला आहे. त्यांच्या या दीर्घकालीन पत्रकारितेची आणि सामाजिक धडपडीची दखल घेऊन सरपंच सेवा संघाच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली.

हा सोहळा सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील सरपंच शरद आरगडे यांच्या शुभहस्ते राजेश गायकवाड यांना मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. 

 

।याप्रसंगी व्यासपीठावर यादवराव पावसे पाटील, सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार, स्वप्निल पाटील, जयदीप तोंडे, अभिनव वाणी, प्राध्यापक बाळासाहेब वाघमारे, सुहास वाणी, राहुल वाणी, डॉक्टर नवनाथ वाणी, पोपट वाणी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारिता हे समाज परिवर्तनाचे साधन – राजेश गायकवाड

पुरस्काराला उत्तर देताना भावूक होत राजेश गायकवाड यांनी आपल्या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “पत्रकारिता हा माझ्यासाठी केवळ व्यवसाय नसून समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय राहिले आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे.”

सरपंचांना सामाजिक परिवर्तनाचे आवाहन

प्रमुख पाहुणे शरद आरगडे यांनी आपल्या भाषणात गायकवाड यांच्या निर्भीड पत्रकारितेचे कौतुक केले. ते म्हणाले की, “गायकवाड यांनी तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही, त्यामुळेच लोकशाहीचा चौथा स्तंभ भक्कम आहे.” याचवेळी त्यांनी उपस्थित सरपंचांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले. “सरपंचांनी केवळ पद न भूषवता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा. शिवीगाळमुक्त गाव, अंधश्रद्धा निर्मूलन, जातमुक्त गाव, विधवा सन्मान यांसारखे ऐतिहासिक ठराव करून गावाला नवे रूप द्यावे,” असे मत त्यांनी मांडले.

राजेश गायकवाड यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे, संपर्क प्रमुख अमोल शेवाळे, कायदेशीर सल्लागार प्रवीण कडाळे यांच्यासह विविध गावांतील सरपंच, पत्रकार आणि संगमनेर तालुक्यातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *