{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

निवडणुकीतील पराभवामुळे नवीन लोकप्रतिनिधी वैफल्यग्रस्त;

खोटे आरोप करणारे तोंडघसी पडतील : माजी नगराध्यक्षांचा जोरदार प्रहार

संगमनेर । झुंझार न्यूज

निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी राबवण्यात आलेली ऐतिहासिक थेट पाईपलाईन योजना पूर्णपणे यशस्वी आणि पारदर्शक झाली आहे. मात्र, नगरपालिका निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे वैफल्यग्रस्त झालेले नवीन लोकप्रतिनिधी संगमनेरचा ‘ब्रँड’ राज्यपातळीवर बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. विधानसभेत करण्यात आलेले आरोप धादांत खोटे असून, आम्ही या योजनेच्या चौकशीचे पूर्णपणे स्वागत करतो. चौकशीतून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईलच, पण खोटे आरोप करणारे तोंडघाशी पडतील, असा घणाघात संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी केला आहे.

या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात सौ. तांबे यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहर हे शांतता आणि विकासासाठी ओळखले जाते. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन २००९ मध्ये निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजना हाती घेण्यात आली. या योजनेला नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह सर्व संबंधित विभागांची रीतसर मंजुरी मिळाली होती. २००९ मध्ये मंजूर झालेल्या योजनेवर २०२६ मध्ये (वर्तमान काळात) अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि अपूर्ण माहितीच्या आधारे आरोप करणे, हे केवळ राजकीय द्वेषातून सुरू आहे.

योजना पूर्णतः कायदेशीर आणि दर्जेदार

५ मे २००९ रोजी प्रधान सचिव आणि सर्व विभागांच्या प्रमुखांच्या बैठकीत ‘यूआयडीएसएसएमटी’ (UIDSSMT) योजनेबाबत चर्चा होऊन, आचारसंहितेपूर्वी कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करूनच कार्यारंभ आदेश दिले होते. या योजनेचे काम अत्यंत दर्जेदार झाले असून, त्याचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ झाल्यानंतरच बिले अदा करण्यात आली आहेत. आज या योजनेमुळेच संगमनेरकरांना दररोज शुद्ध आणि मुबलक पाणी मिळत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेसारख्या पवित्र सभागृहाचा वापर संगमनेरची बदनामी करण्यासाठी केला जात असल्याबद्दल दुर्गाताई तांबे यांनी संताप व्यक्त केला. “आतापर्यंत शहर किंवा तालुक्यासाठी एक रुपयाचाही निधी न आणणाऱ्यांनी केवळ बदनामीचे उद्योग सुरू केले आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या योजनेच्या चौकशीचे जे आदेश दिले आहेत, त्याचे आम्ही स्वागतच करतो. सत्य बाहेर आल्यावर तोंडाच्या वाफा दवडणाऱ्यांची नक्कीच नाचक्की होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 पराभवाच्या धक्क्यातून आरोप – सोमेश्वर दिवटे

“नगरपालिका निवडणुकीत नवीन लोकप्रतिनिधींच्या घरातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा आणि सर्व नगरसेवकांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. जनतेने नाकारल्यामुळे आलेल्या नैराश्यातून हे आरोप केले जात आहेत. शहरातून ‘टक्केवारी’ बंद झाल्याने ही वैफल्यग्रस्तता असावी,” अशी टीका संगमनेर शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे.

प्रशासकीय बाबींची जबाबदारी प्रशासनाची – विश्वासराव मुर्तडक

माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी म्हटले आहे की, नगरपालिकेचे कामकाज करताना तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची असते. यात नगराध्यक्ष किंवा नगरसेवकांचा हस्तक्षेप नसतो. तरीही जाणीवपूर्वक लोकप्रतिनिधींची नावे घेऊन शहराची बदनामी करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *