{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

अकोले । झुंझार न्यूज

अकोले तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे विकास नामदेव वाकचौरे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीवर (DPC) सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, सुगांव फाटा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकासकामांची दिशा ठरवणारी महत्त्वाची समिती मानली जाते. या समितीवर विकास वाकचौरे यांची वर्णी लागल्याने अकोले तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना गती मिळेल आणि विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या सत्कार समारंभाप्रसंगी रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब गायकवाड, ज्येष्ठ नेते माणिकराव यादव, वडगांव पान ग्रा . प . सदस्य अरुण कुळधरण , संतोष रोहोम, भाऊसाहेब वाकचौरे, कळस गावचे सरपंच राजेंद्र गवांदे, रमेश शिरकांडे, शिंदे साहेब, तसेच माजी पोलीस निरीक्षक फटांगरे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विजयराव वाकचौरे म्हणाले की, विकास वाकचौरे यांचा जनसंपर्क आणि कामाचा अनुभव जिल्ह्याच्या नियोजनात नक्कीच मोलाचा ठरेल. तालुक्यातील रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ते प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सत्कारानंतर विकास वाकचौरे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि दिलेल्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देण्याचे आश्वासन दिले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *