कोकणगावात असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

शिवसेनेसह युवासेनेचे तालुक्यात चांगले संघटनात्मक काम सुरू असून, आगामी काळात संगमनेर तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी ‘गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गावात शिवसेना शाखा उभारून नागरिकांचे स्थानिक प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील कोकणगाव येथे असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आ. खताळ बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश शिंगोटे प्रकाश जोंधळे खंडू वायकर दीपक जोंधळे भगीरथ पानसरे पंकज जोंधळे सचिन बोधक शैलेश वायकर सतीश वायकर दीपक वायकर मंगेश वायकर दीपक पवार रामनाथ वायकर सचिन वायकर विजय वायकर दीपक पवार वैभव जोंधळे अनिल जोंधळे अमोल जोंधळे समाधान पवार शुभम जोंधळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख तालुकाप्रमुख सुशील शेवाळे शहर प्रमुख सार्थक शेवाळे आदित्य पवार संदीप जोंधळे सोमनाथ जोंधळे हौशीराम जोंधळे भारत जोंधळे महेश जोंधळे आणि विलास काशीद यांच्यासह शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते
आमदार खताळ म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यसरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावी पणे पोहोचत आहेत. कोकणगावात मागील काळात विविध विकासकामे पूर्ण झाली असून, आगामी काळातही मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. विकास कामां साठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले

. जळालेले अथवा नादुरुस्त वीज रोहित्र बदलण्यासाठी ग्रामस्थांना वर्गणी काढावी लागत होती. मात्र महायुती सरकारच्या काळामध्ये नागरिकांकडून एक रुपयाही न घेता तातडीने नवीन वीज रोहित्र उपलब्ध करून दिले जात आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांवर सरकारने विशेष भर दिला असून,विविध योजनांद्वारे नागरिकांना थेट लाभ मिळत आहे.
या शिवाय, तालु क्यातील सुमारे २८ हजार बांधकाम कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महायुतीचे सरकार असल्याने विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होत असून, प्रलंबित कामांना गती मिळत आहे असे त्यांनी सांगितले. मेंढवन येथे १३२ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्यासाठी आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा सुरू असून, हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, असा विश्वासही आमदार खताळ यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विद्यार्थ्यांच्या अडचणीची तातडीने दखल; कोकणगावात एसटी थांबविण्याच्या सूचना

 

 

कोकणगाव येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संगमनेरला ये-जा करताना एसटी बस गावात थांबत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांच्या निदर्शनास आणून दिली. “इतकी वर्षे गावात एसटी बस थांबू शकली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असे म्हणत आमदार खताळ यांनी आश्चर्य व्यक्त केले. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कोकणगाव येथे एसटी बस नियमित थांबविण्याबाबत संगमनेरचे आगार व्यवस्थापकांना तातडीने आवश्यक त्या सूचना दिल्या जातील .

श्री अमोल खताळ पाटील
आमदार संगमनेर विधानसभा
…………………………………….

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *