रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय थलपती यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत ना. रामदास आठवले यांनी विजय थलपती यांना तामिळनाडुत मिळालेल्या बहुमताच्या विजयाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
तामिळनाडुतील दलितांवर वाढते अत्याचार आहेत ते रोखण्यासाठी अॅट्रोसीटी अॅक्टची कोटेकोरपणे अंमलबजावणी करावी. वाढत्या दलित अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तसेच तामिळनाडुतील दलितांना 5 एकर जमीन देवुन भुमिहीन दलितांना आधार द्यावा अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या ज्या काही अडचणी असतील आणि त्याबाबतचा जो निधी असेल तो पुरेपुर निधी आपण पाठवु. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार सबका साथ सबका विकास या नीतीने काम करीत आहे. एनडीए प्रणित पक्षांचे जिथे सरकार नाही त्या राज्यांनाही समान निधी वाटप केला जातो.सर्व राज्यांना केंद्र सरकार आवश्यक तेव्हढा निधी देत असते तामिळनाडू ला ही पुरेपूर निधी केंद्र सरकार कडून दिला जाईल अशी असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या कडे व्यक्त केला. निवडणुकीपूर्वी विजय थालपती यांनी एन डी ए सोबत येण्याचे आपण आवाहन केले होते त्याची आठवण ना. रामदास आठवले यांनी आज मुख्यमंत्री विजय थलपती यांना करून दिली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या भारत देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांच्याच संकल्पनेतुन रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आहे.रिपब्लिकन पक्षाचे पहिले अध्यक्ष एन शिवराज हे तामिळनाडूचे होते असा इतिहास ना. रामदास आठवले यांनी विजय थलपती यांना सांगितला. आपल्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष देशात 28 राज्यात आणि 8 केंद्रशासीत प्रदेशात कार्यरत आहे. तामिळनाडुतही रिपब्लिकन पक्षाचे चांगले संघटन आणि अनेक शाखा आहेत अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.
आपण चित्रपट क्षेत्रात चांगली कामगिरी करुन लोकप्रिय अभिनेते म्हणून पुढे आलात, आपल्या सारख्या लोकप्रिय अभिनेत्याला तामिळनाडुतील जनतेने मुख्यमंत्री पदाचा मान दिला. ही आपली ऐतिहासिक आपली चांगली कामगिरी असल्याचे अभिनंदन ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री विजय थलपती यांचे केले.
तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्याशी ना.रामदास आठवले यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तामिळनाडुचे प्रदेशाध्यक्ष फादर सुसाई आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.