भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल कोकणगाव ( संगमनेर ) येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि युवकांचे संघटन करणारा नेता म्हणून सचिन शिंदे यांची ओळख आता जिल्हा पातळीवर निर्माण झाली आहे.
सचिन शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. केवळ राजकीय पदे भोगण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून लोकांचे प्रश्न सोडवण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी त्यांनी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
सचिन शिंदे यांच्या निवडीचे वृत्त समजताच कोकणगावसह परिसरातील युवक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. सत्कार समारंभावेळी बोलताना उपस्थित युवकांनी सांगितले की, “सचिन भाऊ हे नेहमीच युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत होईल आणि आगामी काळात पक्षाला मोठी ताकद मिळेल.”
यावेळी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सर्वसामान्यांच्या हितासाठी अहोरात्र कष्ट करणार असल्याचे सचिन शिंदे यांनी आश्वासन दिले.