Shrirampur : Zunjhar news
एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे झालेल्या बैठकीत दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष पदी अशोकराव रामभाऊ मोरे यांची निवड करण्यात आली . यावेळी संस्थापक अध्यक्ष रेवननाथ जाधव यांच्या हस्ते अशोकराव मोरे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले . यावेळी माणिकराव वाघ , दक्षिण नगर जिल्हा उपाध्यक्ष अनिलराव बर्डे , राजेन्द्र माळी , अतुल मोरे , दत्तात्रय मोरे , सर्जेराव रंधे , अलम मुलांनी , कैलास काळे , विकास पवार , अजय गोरे , करणं गायकवाड , बाळू गायकवाड , गणेश शेंडे , पिंटू गायकवाड , आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी रेवननाथ जाधव म्हणाले की , संपूर्ण राज्यात आदीवाशी समाज्याचा मोठा वर्ग असून बहुतांश ठिकाणी आदीवाशी समाज्य हा विविध सुविधा पासून वंचित आहे . समाज्यातील प्रत्येक माणसाला सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी काम करत असून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात एकलव्य आदिवाशी बहुजन पार्टीशी जोडला जात आहे . समाज्याच्या सर्वागीण विकासाकरिता राजकारणातून सत्तेची अत्यंत आवश्यकता असल्याने भविष्यात सर्व निवडणुकांमधून कार्यकर्त्यांला निवडणुक लढविण्याची संधी देवून आदिवाशी समाज्याला सत्तेच्या प्रवाह आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे .
