संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या पुतळ्यासाठी आवश्यक असलेली जागा परिवहन विभागाने अधिकृत पणे संगमनेर नगरपालिकेकडे हस्तांतरित केल्याने शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिपब्लिकन पक्षाने या निर्णयाचे स्वागत केले असले, तरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरू केली आहे ते कार्यालय हटवावे अन्यथा आरपीआयच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके आणि शहराध्यक्ष कैलास कासार यांनी दिला
संगमनेरचे हायटेक बसस्थानक राज्यातील एक मॉडेल बसस्थानक म्हणून ओळखले जाते. बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शिवप्रेमी तसेच विविध सामाजिक संघटनांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर परिवहन विभागाने पुतळ्यासाठीची जागा नगरपालिके कडे हस्तांतरित केली असल्याच्या मागणीला प्रशासकीय मान्यता मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे लवकरच संगमनेर बस स्थानक परिसरात शिवरायांचे भव्य स्मारक उभारले जाण्याची शक्यता असून नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा उभारण्या साठी नियोजित करण्यात आलेल्या जागेवर राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय सुरू करण्यात आले आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे. .
“ज्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणे अपेक्षित होते, त्या जागेवर उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आणण्यात आले आहे. यामुळे महापुरुषाच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा,” अशी भूमिका आशिष शेळके यांनी मांडली.
रिपब्लिकन पक्षाने प्रशासनासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत दोन प्रमुख पर्याय ठेवले आहेत. नियोजित जागेतील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय तात्काळ अन्यत्र हलवून त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे. अथवा संगमनेर हायटेक बसस्थानका समोरील मोकळ्या जागेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारून परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी पक्षाने केली आहे
प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेवर लवकरच धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा तालुका कार्याध्यक्ष विजय खरात, तालुका संघटक मधुकर सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोंडे,[8/19, 10:26 PM] आशिष शेळके: योगेश कर्डक, महिला आघरूडपा तालुकाध्यक्ष रुपाली सोनवणे तालुका उपाध्यक्ष रमेश भोसले, बाळासाहेब कदम, तालुका सहसरचिटणीस नानाभाऊ कदम, तालुका सचिव जनार्दन साळवे, विजय अडांगळे, शरद जमदाडे, आत्माराम अडांगळे, तालुका सरचिटणीस पप्पू रोकडे, संपत भोसले, भारत भोसले, सिद्धार्थ भोसले, पठार भाग प्रमुख सागर शिंदे, तालुका सहसरचिटणीस सिद्धार्थ खरात, दीपक खरात, राजू वाघमारे, शशिकांत रोकडे, शरद तपासे, नितीन भालेराव, शहा नवाज बेगमपुरे, सिद्धार्थ दारोळे, विकास गायकवाड, नानाभाऊ जगताप, बंटी जगताप, भारत गायकवाड, दीपक निळे, सुनील कदम, गोविंद सोनवणे, प्रदीप सोनवणे, दिनकर खरात, सुभाष शेळके आदींनी दिला आहे .