{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

श्रीरामपूर । झुंझार न्यूज 

 


केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब हे सोमवार, दिनांक २४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राहाता तालुक्यातील वाकडी येथे कालकथित राजाभाऊ कापसे यांच्या शोकसभेसाठी ते उपस्थित राहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ना. रामदास आठवले हे सोमवारी सकाळी ११ वाजता वाकडी येथे पोहोचतील. त्यांचा हा दौरा छत्रपती संभाजीनगरमार्गे श्रीरामपूरवरून वाकडी असा नियोजित आहे. नामदार आठवले यांचे सकाळी १० वाजता श्रीरामपूर येथे आगमन होईल.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन, तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ आणि युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी १० वाजता श्रीरामपूर येथील व्हीआयपी गेस्ट हाऊस (VIP Guest House) येथे उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

श्रीरामपूर येथे नामदार आठवले साहेबांचे स्वागत करून त्यानंतर सर्व पदाधिकारी वाकडी येथील शोकसभेसाठी रवाना होणार आहेत. या शोकसभेला रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव , दिपकराव गायकवाड , आशिष शेळके ,अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *