संगमनेर-कोल्हार रस्त्यावर सुनेत्रा पवार यांचे जंगी स्वागत

 

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथील नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना, संगमनेर-कोल्हार रस्त्यावरील मांचीहिल फाटा येथे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. सरूनाथ पाटील उंबरकर यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान सरूनाथ पाटील उंबरकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. विशेषतः आश्वी जिल्हा परिषद गट आणि जोर्वे जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकासकामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून सरकारी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी निवेदनाद्वारे केली. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी हा निधी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

याप्रसंगी विठ्ठलराव भुसाळ, भागवतराव खेमनर, गणेश भुसाळ, स्वप्नील उंबरकर, सुरेश भुसाळ, रवींद्र भुसाळ, सचिन सारबंदे, रमजान शेख, सुनील बर्डे, संकेत खेमनर, ऋतीक माळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मांचीहिल फाट्यावर झालेल्या या स्वागत कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. सुनेत्रा पवार यांनीही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *