नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील हजारवाडी (पानोडी) येथे समस्त ग्रामस्थ आणि विविध मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘२३ व्या अखंड हरिनाम सप्ताहा’चे आयोजन शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरु करण्यात आला आहे. शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात दररोज अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेत काकडा भजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ७ ते ९ या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सप्ताहात नामवंत कीर्तनकार आपली सेवा देत आहेत 

२९ ऑगस्ट (शनिवार): ह.भ.प. सचिन महाराज गायकवाड (आश्वी)
३० ऑगस्ट (रविवार): ह.भ.प. गणेशगिरी महाराज (चिंचेवाडी)
३१ ऑगस्ट (सोमवार): विनोदाचार्य ह.भ.प. मयूर महाराज औटी (आळंदी)
०१ सप्टेंबर (मंगळवार): ह.भ.प. जगन्नाथ महाराज उंबरकर (उंबरी बाळापूर)
०२ सप्टेंबर (बुधवार): ह.भ.प. नामदेव महाराज पऱ्हाड (केंदूर, आळंदी)
०३ सप्टेंबर (गुरुवार): ह.भ.प. बाबासाहेब महाराज माळी (डिग्रस)
०४ सप्टेंबर (शुक्रवार): भागवत सेविका ह.भ.प. साक्षीदीदी सोडनर (मांडवे बु.)

शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. सुनील महाराज पवार (आश्वी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होईल. त्यानंतर भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. या सप्ताहात ह.भ.प. मयूर महाराज मोरे हे मृदुंगाचार्य म्हणून साथ देणार आहेत.

या सप्ताहासाठी गावातील विविध परिवारांनी (सुळ, खैरे, घुगे, साबळे, नागरे, सांगळे, हजारे, कोळेकर, हाळनोर, हालवर, सानप, पालवे, भडकवाड, थोरात, मोरे, कोरडकर, ढोणे, खेमनर, वाकचौरे, रुपनर, श्रीराम) अन्नदाते व पहारेकरी म्हणून विशेष जबाबदारी स्वीकारली आहे.

हनुमान भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ आणि समस्त ग्रामस्थ हजारवाडी (पानोडी) यांनी या धार्मिक सोहळ्याचे नेटके नियोजन केले असून, परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनसेवेचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *