इंदापूर तालुक्यातील बाबीर देवस्थान राज्यभरातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

चांगला पाऊस पडून शेतकरी बांधवांची चिंता मिटू दे – मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर । झुंझार न्यूज
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले इंदापूर तालुक्यातील श्री.क्षेत्र बाबीर देवस्थानचा कलशारोहण व लोकार्पण सोहळा काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला असून राज्यभरात पावसाने ओढ दिली असल्याने शेतकरी चिंतेत आहे. येत्या काळामध्ये सर्वत्र भरपूर पाऊस पडून शेतकरी व नागरिक समाजाने होऊ दे अशी प्रार्थना यावेळी राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बाबीर चरणी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रुई येथे बाबीर देवस्थानचा कलशारोहण व लोकार्पण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरण संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री दत्तामामा भरणे, मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार महादेव जानकर, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, संगमनेर तालुक्यातील बुवाजी बाबा पुणेकर, उमाजी बाबा पुणेकर, बबन दादा सांगळे, साहेबराव दादा मंडलिक, मंदिराचे आर्किटेक्ट बि.आर.चकोर, अंभोरेचे माजी सरपंच भास्करराव खेमनर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, श्री.क्षेत्र बाबीर हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. संगमनेर आणि बाबीर क्षेत्राचे जवळचे नाते आहे. यामुळे संगमनेर तालुक्याची एक आगळे वेगळे आध्यात्मिक नाते निर्माण झाले आहे. अध्यात्म ही मनशांतीची मोठी शक्ती आहे. राज्यभरात यावर्षी पावसाने मोठी ओढ दिली आहे. त्यामुळे सर्वत्र चिंता आहे. येत्या गणेशोत्सव काळामध्ये सर्वत्र चांगला पाऊस पडून राज्यातील शेतकरी व नागरिक समाधानी व आनंदी होऊ दे. त्याचप्रमाणे अल निनोचे संकट विघ्नहर्ता गणेशाने टाळावे अशी प्रार्थना ही त्यांनी श्री.क्षेत्र बाबीर या ठिकाणी केली.
तर उपमुख्यमंत्री सुनिता ताई पवार म्हणाल्या की, बाबीर क्षेत्र हे पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अध्यात्माचे मोठे ठिकाण आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सरकारच्या माध्यमातून सातत्याने निधी दिला जाईल असे त्या म्हणाल्या.
तर कृषिमंत्री दत्तामामा भरणे म्हणाले की, हजारो भाविकांचे देवस्थान असलेल्या या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. माजीमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुका हा कायम आध्यात्म आणि सहकारातून राज्याला दिशा देणार आहे. तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, संगमनेर तालुक्यामध्ये श्री.क्षेत्र बाबीर देवस्थानचे मोठे भक्त आहेत.
यावेळी या मंदिराच्या उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कर्मवीर शंकरराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
इंदापूर तालुक्यामध्ये सहकारातून समृद्धी निर्माण करणारे कर्मवीर शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना येथे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आ.महादेव जानकर यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

