{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील व ध्रुवदादा विखे पाटील यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण

 

झुंझार न्यूज | लोणी 

 

लोणी (ता. राहाता) येथे ‘अक्षय अनारसे फिल्म ॲक्टिंग, लोणी प्रवरा’ प्रस्तुत मराठी भक्तिगीत ‘कोल्हारची माझी आई भगवती’ या भक्तिगीताच्या पोस्टरचे अनावरण राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुजयदादा विखे पाटील आणि प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणीचे विश्वस्त ध्रुवदादा राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

साडेतीन शक्तिपीठांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या भक्तिगीताच्या माध्यमातून कोल्हार येथील आई भगवतीच्या भक्तीचा महिमा रसिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या भक्तिगीताच्या पोस्टर अनावरणामुळे परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात या गीताची चर्चा होत आहे.

या कार्यक्रमाला अहिल्यानगर उत्तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, पप्पू शेठ गाडे, अण्णासाहेब कडू, पद्मश्री कारखान्याचे संचालक किरण दिघे, बाळासाहेब लाटे यांच्यासह सरुनाथ उंबरकर, रमेश शेठ पन्हाळे, विजयराव म्हसे, प्रकाशराव ताठे, आर. डी. कदम सर, गोरक्षनाथ तांबे, अशोक घोलप, हिराबाई पाटोळे, रंगनाथ उंबरकर, श्रीकांत घोरपडे, डॉ. सोमनाथ गोरे आणि रामप्रसाद मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘अक्षय अनारसे फिल्म ॲक्टिंग, लोणी प्रवरा’ यांच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या ‘कोल्हारची माझी आई भगवती’ या भक्तिगीतातून भक्तीभाव आणि महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेचे दर्शन घडणार आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *